शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पायाभूत सुविधा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST

सोनवणे यांनी म्हटले आहे, या योजनेंतर्गत शेतावर तसेच विविध शेतमाल संकलन क्षेत्राच्या ठिकाणी शेतकरी व त्यांच्या संस्थांना काढणी पश्चात ...

सोनवणे यांनी म्हटले आहे, या योजनेंतर्गत शेतावर तसेच विविध शेतमाल संकलन क्षेत्राच्या ठिकाणी शेतकरी व त्यांच्या संस्थांना काढणी पश्चात सुविधा उभारणीसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देऊन पायाभूत सुविधा विकासाच्या व्यवहार्य प्रकल्पांसाठी आणि समूह शेती मालमत्ता निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. ही योजना सन २०२०-२०२१ ते २०२९- २०३० या कालावधीसाठी असेल.

प्राथमिक कृषी पतसंस्था विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयसहाय्यता गट, शेतकरी, संयुक्त उत्तरदायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप आणि केंद्र, राज्य भागिदारी संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांना या योजनेचा लाभ घेता येईल. दोन कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व कर्जावर वार्षिक ३ टक्के सवलत, जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत उपलब्ध पत हमी, पात्र कर्जधारकांसाठी दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी पतहमी संरक्षण उपलब्ध राहील.

पात्र प्रकल्प : कापणीनंतरचे व्यवस्थापन प्रकल्प, ई- मार्केटिंग, प्लॅटफॉर्म, गोदाम, पॅक हाऊस, मूरघास संकलन केंद्र, वर्गवारी आणि प्रतवारी गृह, शीतगृह, पुरवठा सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर आणि सामूहिक शेतीकरिता आवश्यक इतर किफायतशीर प्रकल्प त्यात सेंद्रिय उत्पादने, जैविक निविष्ठा उत्पादन, अचूक शेती व्यवस्थापन, पुरवठा साखळी सुविधा पीपीपी तत्वावर केंद्र व राज्य सरकारच्या शेतीसाठीच्या योजनांमधील सुविधा समावेश आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी म्हटले आहे.