शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

चाकूहल्लाप्रकरणी आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST

शहरातील करवंद नाका परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ़.आत्माराम भगवान लोखंडे (६५) यांच्यावर अज्ञाताने गेल्या रविवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने ...

शहरातील करवंद नाका परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ़.आत्माराम भगवान लोखंडे (६५) यांच्यावर अज्ञाताने गेल्या रविवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता. हल्ल्यादरम्यान डॉ़लोखंडे यांच्या पत्नी अलका यांनी आरडाओरडा करत लोकांना गोळा केले होते. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झालेला होता. या हल्ल्यात डॉ़लोखंडे यांना जबर जखम झालेली होती. त्यांच्या दोन्ही हातांवर, तसेच गळ्यावर हत्याराने वार करण्यात आलेला होता. हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्त सांडले गेले होते. त्यांना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी त्यांनी धुळे येथे हलविण्यात आले होते़.

उपचारानंतर डॉ़लोखंडे यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ़लोखंडे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे, घराचा दरवाजा बंद होता. सदर संशयिताने दरवाजा ठोकल्यानंतर लोखंडे यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडून पाहिले असता, संशयित बाहेर लपलेला होता. दरवाजा उघडल्यानंतर तो आत आला. त्याच्या हातात चाकू होता, तसेच त्याने मेहंदी रंगाचे टी शर्ट व काळा मास्क लावलेला होता. त्याने डॉ़लोखंडे यांचे डोके पकडून गळा कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोखंडे यांनी यावेळी प्रतिकार केला. त्यामुळे डॉ़लोखंडे यांच्या चेहऱ्यावर, गळ्यावर, दोन्ही हातांना व छातीला संशयिताने चाकूने वार करून जबर दुखापत केली होती. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. यावेळी लोखंडे व संशयित दोन्ही जमिनीवर खाली पडले होते. हा प्रकार त्यांची पत्नी अलका यांच्या लक्षात आला. त्यांनी बाहेरील लोकांना जोरदार आवाज दिला. त्यावेळी गर्दी झाली. संशयित घरातील आतील जिन्याने वर गच्चीवर पळून गेला. त्याच्या मागे गेले असता तो पळून गेला. या संदर्भात लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी हल्लेखोरांवर भादंवि कलम ३०७, ४५२, ४४७, ४४८, ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या संदर्भात पोलिसांनी एका संशयिताला अटक केलेली आहे. सदर संशयिताने हल्ला केल्याचे कबूल केले आहे. सदर संशयित सूर्यकांत चंद्रकांत कलाल (२०) राहणार रामसिंगनगर शिरपूर असे सांगण्यात आले. सदर संशयितास न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पीएसआय किरण बार्हे करीत आहेत.