शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यात पुलाच्या भिंती पडल्या उघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

रस्ताही उखडला : दगडी पिचिंग, भिंत उभारण्याकडे दुर्लक्ष तुळजापूर : तुळजापूर ते केशेगाव मार्गावर तुळजापूर (खु.) गावानजीक बांधकाम विभागाने ...

रस्ताही उखडला : दगडी पिचिंग, भिंत उभारण्याकडे दुर्लक्ष

तुळजापूर : तुळजापूर ते केशेगाव मार्गावर तुळजापूर (खु.) गावानजीक बांधकाम विभागाने चार महिन्यांपूर्वी पूल उभारणीचे काम पूर्ण केले. मात्र, दगडी पिचिंग, सिमेंट भिंत उभारण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रविवारी झालेल्या पावसात या पुलाच्या भिंती उघड्या पडल्या असून, रस्ताही उखडला गेला आहे. यामुळे लाखो रुपये खर्चूनही परिपूर्ण काम झाले नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

तुळजापूर (खुर्द) येथील नदीचा पूल हा तुळजापूरमार्गे मोर्डा, तडवळा, धारूर, केशेगाव, बामणी, बेंबळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना या मार्गावर जाणाऱ्या वाहनांसाठी व नागरिकांसाठी प्रमुख वर्दळीचा आहे. हा पूल कमी उंचीचा असल्याने प्रत्येक पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहात होते. यामुळे तुळजापूरमार्गे मोर्डा, धारूर आदी गावांकडे जाणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटत होता. शिवाय, मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाने या पुलावर मोठा खड्डा पडला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डा बुजवून मलमपट्टी केली. परंतु, पूल खचत चालल्याने बांधकाम विभागाने या ठिकाणी नवीन पूल उभारणीचे काम हाती घेतले. यावर जवळपास दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, पुलाच्या बाजुला दगडी पिचिंग केली नाही. तसेच सिमेंटची भिंतही उभारण्यात आली नाही. त्यामुळे पुलाचे काम होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटत असतानाच रविवारी रात्री झालेल्या पावसाने पुलाच्या चारही बाजूने पाणी घासून जाऊन रस्त्याची दुरवस्था झाली. शिवाय, पिचिंग नसल्याने पुलाच्या भिंतीही उघड्या पडल्या आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

चौकट.......

बजेट कमी पडले

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पूर हानी निधीतून जवळपास दहा लाख रुपये खर्च करून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, बजेट कमी असल्यामुळे पिचिंग, सिमेंट भिंतीचे काम राहिले आहे. सदरील काम हे अंदाजपत्रकानुसार पूर्ण झालेले आहे.

फलक काढण्याचा प्रशासनाला विसर

पुलाचे काम पूर्ण होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला. यानंतर मार्गावरून वाहतूकही सुरू झाली. परंतु, काम सुरू असताना वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘रस्ता बंद’ असा लावलेला सूचना फलक बांधकाम विभागाने अजूनही हटविलेला नाही. यामुळे वाहनचालकांची दिशाभूल होत आहे.

190721\242620210719_083941.jpg

तुळजापुर फोटो