तुळजाभवानी मंदिर परिसरात २४ जणांवर 'कोटपा'चा बडगा; तंबाखू-गुटखा बाळगणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:10 IST2026-04-16T16:05:22+5:302026-04-16T16:10:02+5:30

मंदिराच्या पवित्रतेशी छेडछाड नको! तुळजापुरात तंबाखू शौकीनांना दणका; प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई.

24 people were arrested for possession of tobacco and gutkha in the Tulja Bhavani temple area; | तुळजाभवानी मंदिर परिसरात २४ जणांवर 'कोटपा'चा बडगा; तंबाखू-गुटखा बाळगणे पडले महागात

तुळजाभवानी मंदिर परिसरात २४ जणांवर 'कोटपा'चा बडगा; तंबाखू-गुटखा बाळगणे पडले महागात

धाराशिव : श्री तुळजा भवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध २४ एप्रिल रोजी दिवसभर कार्यवाही करण्यात आली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यान्वये (कोटपा) राबविलेल्या या मोहिमेत २४ जणांकडे तंबाखू, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या सर्वांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

श्री तुळजा भवानी मंदिरात तंबाखूजन्य पदार्थ बाळगण्यास किंवा सेवन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीही बरेचसे भाविक असे पदार्थ बाळगत असल्याचे निदर्शनास आले. याअनुषंगाने मंगळवारी दिवसभर कोटपा कायद्याच्या कलम ४, कलम ६ (अ) व कलम ६ (ब) अन्वये एकूण २४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मंदिर परिसरातील २२ व मंदिर प्रशासकीय इमारतीतील २ व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याकडून एकूण ४,६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत डॉ. विक्रांत राठोड (जिल्हा सल्लागार), प्रदीप तटाळे (एनसीडी समुपदेशक), भाग्यश्री हिरेमठ (एनसीडी समुपदेशक) तसेच कृष्णा सावंत (नर्सिंग ऑफिसर) यांनी सहभाग घेतला.

याशिवाय मंदिर संस्थानचे स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे, सहायक स्वच्छता निरीक्षक सुमित रघुजीवार आणि सहायक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. दरम्यान, मंदिर संस्थानने आवाहन केले आहे की, मंदिर व मंदिर परिसर हे पवित्र तसेच सार्वजनिक स्थळ असल्याने येथे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. परिसरात कोणी थुंकताना आढळल्यास संबंधित व्यक्तीचा फोटो काढून मंदिर प्रशासनाकडे द्यावा. प्राप्त तक्रारींवर मंदिर संस्थानच्या वतीने तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

काय आहे कोटपा कायदा..?
कोटपा अर्थात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा शासनाने तयार केला आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाहीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. अशा संबंधित व्यक्तींवर ही यंत्रणा दंडात्मक कार्यवाही करू शकते. पहिल्यांदा आढळून आल्यास २०० रुपये दंड केला जातो.

 

Web Title : तुलजाभवानी मंदिर क्षेत्र में तंबाकू पर कार्रवाई, 24 पर जुर्माना

Web Summary : तुलजाभवानी मंदिर क्षेत्र में कोटपा अधिनियम के तहत तंबाकू उत्पादों के कब्जे के लिए 24 व्यक्तियों पर जुर्माना लगाया गया। मंदिर ट्रस्ट ने भक्तों से तंबाकू के उपयोग से बचने और परिसर की पवित्रता बनाए रखने के लिए अपराधियों की रिपोर्ट करने का आग्रह किया। कुल ₹4,650 का जुर्माना वसूला गया।

Web Title : Crackdown on Tobacco in Tuljabhavani Temple Area; 24 Fined

Web Summary : 24 individuals were fined for possessing tobacco products in the Tuljabhavani temple area under the COTPA Act. The temple trust urges devotees to avoid tobacco use and report offenders to maintain the sanctity of the premises. A total fine of ₹4,650 was collected.