पुण्यात तरुणाचा खून करुन मृतदेह पोत्यात बांधून टाकला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 10:24 AM2020-09-29T10:24:52+5:302020-09-29T10:35:20+5:30

स्वामी नारायण मंदिराजवळ मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

a young man was killed and his body was tied in a sack In Pune | पुण्यात तरुणाचा खून करुन मृतदेह पोत्यात बांधून टाकला

पुण्यात तरुणाचा खून करुन मृतदेह पोत्यात बांधून टाकला

Next
ठळक मुद्देनागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती कळविली.

पुणे: मुंबई बंगलुरु महामार्गावरील आंबेगाव खुर्द येथे तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह एका पोत्यात टाकून दिला असल्याचे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्वामी नारायण मंदिराजवळ मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास 'मॉर्निंग वॉक'साठी जाणार्‍या नागरिकांना स्वामी नारायण मंदिराजवळील सेवा रस्त्याच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह पोत्यात बांधून हात- पाय बांधलेल्या अवस्थेत दिसला. 

नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती कळविली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खून करण्यात आलेल्या तरुणाचे अंदाजे वय २५ ते ३० च्या दरम्यान असून मृत तरुणाला गोधडीमध्ये लपेटून त्याचे हात- पाय बांधून पोत्यामध्ये घालून मृतदेह ठेवण्यात आला आहे. तसेच, हा मृत तरुण हा अर्धनग्न अवस्थेत होता. 

या प्रकारामुळे सकाळी 'मॉर्निंग वॉक'ला येणार्‍या नागरिकांमध्ये खळबळ उडाली. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आणखी बातम्या...

- कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार; 'या' दिवशी देशव्यापी रेलरोकोची हाक    

-  सुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार? एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल     

- शिक्षण संस्थाच नव्हे तर RBI, LIC आणि सरकारी बँक कर्मचार्‍यांच्या पगारातून 'पीएम केअर्स'साठी २०५ कोटी     

- WhatsApp चॅट्स लीक होतायेत, मग 'या' सोप्या पद्धती वापरून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता    

- सुट्टीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर वाचा कोरोना संबंधित सर्व राज्यांचे नियम    

Web Title: a young man was killed and his body was tied in a sack In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.