WhatsApp चॅट्स लीक होतायेत, मग 'या' सोप्या पद्धती वापरून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 04:11 PM2020-09-28T16:11:32+5:302020-09-28T16:23:42+5:30

सध्या तुम्ही व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्याच्या बातम्या सतत वाचत असाल. ड्रग्ज प्रकरणाची एनसीबी व्हॉट्सअॅप चॅटवरून बॉलिवूडमधील कलाकारांची चौकशी करत आहे.

यातच, अनेक सेलिब्रिटींच्या व्हॉट्सअॅप चॅटिंग सुद्धा समोर येत आहे. ड्रग्स प्रकरणाची चौकशी चालू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप चॅट्स लीक होणे साधारण बाब नाही.

कारण, व्हॉट्सअ‍ॅपचा असा दावा आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर केलेले चॅट्स एंड टु एंड एन्क्रिप्शनचे असतात. सेंडर आणि रिसिव्हर या व्यतिरिक्त कोणीही, अगदी व्हॉट्सअॅप देखील ते वाचू शकत नाही.

जरी असे असले तरी व्हॉट्सअॅप चॅट लीक कसे टाळता येईल हे माहीत असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरुन थेट चॅट्स नाही तर अप्रत्यक्ष चॅट्स लीक होऊ शकतात आणि त्याविषयी तुम्हाला माहिती नसते. एंड टु एंड व्हॉट्सअॅप चॅट्स असतात. परंतु कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याचे बॅकअप एंड टु एंड एन्क्रिप्टेड नसते.

क्लाउडवर चॅट बॅकअपला करा इग्नोर - iCloud आणि Gmail Drive वर व्हॉट्सअ‍ॅपचे चॅट बॅकअप असते. iPhone युजर्ससाठी iCloud, तर अँड्रॉइड युजर्सचा व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप जीमेल ड्राईव्हवर जातो. हे स्पष्ट आहे की बॅकअपसाठी चॅट्स एंड टु एंड एन्क्रिप्टेड नसते, हे धोकादायक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही चॅट बॅकअप बंद करू शकता. आवश्यक चॅटिंगचा बॅकअप घ्यायचा असल्यास तुम्ही ईमेलवर एक्स्पोर्ट करू शकता. यानंतर, तुम्ही हे चॅटिंग कंप्युटरवर डाउनलोड करून डिलीट करू शकता. तसेच, यामुळे आपला बॅकअप देखील राहील आणि क्लाउडमधून चॅट लीक होण्याची काहीच समस्या राहणार नाही.

जर तुम्हाला चॅट्सला क्लाउडवर बॅकअप घ्यायचे असल्यास तुम्हाला यासाठी क्लाउड ड्राइव्हला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी, तुम्हाला एक स्ट्राँग पासवर्ड ठेवावा लागेल. तसेच, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुद्धा एनेबल करावे लागेल. हे जीमेलच्या पासवर्ड सेटिंगमध्ये मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपचा बॅकअप तुम्हाला क्लाउड स्पेसमधून डिलीट करायचा असल्यास हा सुद्धा ऑप्शन तुमच्याजवळ आहे. यासाठी तुमच्या जीमेल आयडीने गुगल ड्राईव्हवर लॉग इन करून व्हॉट्सअॅप फोल्डरवर जाऊ शकता. येथून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप फाईल डिलीट करू शकता.

तसेच, सामान्य सुरक्षा आणि सुरक्षेसाठी व्हॉट्सअॅप लॉक करू शकता. येथे सुद्धा टू स्टेप व्हेरिफिकेशन एनेबल करा आणि व्हॉट्सअॅप वेब सेशनला सतत मॉनिटर करून साइन आउट करा.