शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

घर खरेदी करण्यासाठी २ लाखात केला पोटच्या मुलाचा सौदा; महिलेची हैराण करणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:36 IST

आरोपी महिला मागील अनेक वर्षापासून बाल तस्करीचं काम करते. मात्र फेब्रुवारीत दिल्ली रेल्वे स्टेशनवर महिलेला २ मुलांसह अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली - एक आई आपल्या मुलांसाठी कुठलीही मर्यादा ओलांडायला तयार असते, मुलांच्या आनंदासाठी आईची काहीही करण्याची तयारी असते. परंतु दिल्लीत एका अशा आईला अटक करण्यात आली आहे जिनं एक घर खरेदी करण्यासाठी स्वत:च्या १५ महिन्याच्या बाळाला २ लाख रूपयात विकायला तयार झाली.  बाल तस्करीच्या या प्रकाराने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आरोपी महिलेने याआधी पहिल्या मुलाला ९० हजारात विकले, त्यानंतर छोट्या बाळाला विकण्यासाठी २ लाखांची किंमत ठेवली. इतकेच नाही तर अद्याप जन्माला न आलेल्या बाळाचाही सौदा आईने केला होता. 

काय आहे प्रकरण?

या महिन्याच्या सुरुवातीला बाल तस्करीत पोलिसांनी एका महिलेला अटक केली. या महिलेने ना इतर मुलांना विकले तर स्वत:च्या मुलांचीही विक्री केली. रेल्वे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा म्हणाले की, जेव्हा बाल तस्करीत पोलिसांनी महिलेला अटक केली. त्यानंतर चौकशीत तिने हा खुलासा केला. दिल्ली पोलिसांनी १० फेब्रुवारीला बाल तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली. त्यात ४ जणांच्या तावडीतून २ लहान मुलांची सुटका करण्यात आली. त्यात एका महिलेलाही अटक करण्यात आले. आर्थिक तंगीतून ही महिला बाळांची विक्री करायची. १५ महिन्याच्या बाळालाही तिने २ लाखांसाठी विकले. गर्भवती असणाऱ्या या महिलेने पोटात वाढत असलेल्या बाळाचाही सौदा केला. 

आरोपी महिला मागील अनेक वर्षापासून बाल तस्करीचं काम करते. मात्र फेब्रुवारीत दिल्ली रेल्वे स्टेशनवर महिलेला २ मुलांसह अटक करण्यात आली होती. चौकशीत या महिलेचं १७ वर्षापूर्वी लग्न झाले होते, तिला २ मुले होती. ७ वर्षांनी पतीने तिला सोडून दिले त्यानंतर तिने दुसरं लग्न केले. दुसऱ्या लग्नातून तिला आणखी २ मुले झाली. ज्यातील एक ६ वर्षाचा आणि एक १५ महिन्याचा होता. २ वर्षापूर्वी फरिदाबादमधील एका महिलेच्या ती संपर्कात आली जिने स्वत:ला डॉक्टर असल्याचं सांगितले. त्यांच्याकडे मुल नव्हते, तिला एक बाळ दत्तक घ्यायचे होते तेव्हा आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या आरोपी महिलेने पहिल्या मुलाला ९० हजारात तिला विकले. 

दरम्यान, महिलेने तिच्या लहान बाळाला २ ते अडीच लाखात विकण्याचं प्लॅनिंग केले जेणेकरून तिला फरिदाबाद इथं छोटेसे घर खरेदी करता येईल. आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तिने पोटातील बाळही विकण्याचं ठरवल्याचं पोलिसांना चौकशीत कळालं. सध्या पोलीस या महिलेची आणखी चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी