शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पुण्यात वाहतूक पोलिसालाच मिळाली पाच हजारांचा दंड भरण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 21:05 IST

वाहतूक पोलिसाने वाहन जप्तीची व आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल या स्वरुपाची दाखवली भीती..

पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटारचालकाला आरटीओमध्ये जाऊन दंड भरावा लागेल,अशी भीती दाखवत अडीच हजार रुपये उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस फौजदार प्रकाश बाबुराव दौंडकर असे शिक्षा झालेल्या पोलिसांचे नाव आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी ही शिक्षा सुनावली आहे.दौंडकर हे विमानतळ वाहतूक विभागात वाहनांवर कारवाई करणाऱ्या टेम्पोवर आॅपरेटर म्हणून कर्तव्यावर होते.६ फेब्रुवारी रोजी त्यांनी एकाची मोटार टो केली होती. मोटारमालक मोटार सोडविण्यासाठी आले. तेव्हा दौंडकर यांनी त्यांचे वाहन जप्त करण्याची व आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल, अशी भीती दाखविली. त्यानंतर टेम्पोचालक संजय बनसोडे व हेल्पर धर्मा यांच्याकडे निर्देश करुन त्यांच्यामार्फत पैशांची मागणी केली. त्यावेळी मोटारमालकाकडून अडीच हजार रुपये घेतले. उपायुक्त अक्कानुवरु यांनी तक्रारीची चौकशी केली. त्यात दौंडकर यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले. पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी दौंडकर यांना ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी