शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 18:57 IST

अटक केलेला मारेकरी शेरू उर्फ शेराचे TIKTOK  व्हिडिओ लोकं खूप पसंत करतात. यूट्यूब आणि TIKTOK वर त्याचे सुमारे ४ लाख १० हजार फॉलोअर्स आहेत.

ठळक मुद्देमिळालेल्या माहितीनुसार, शेरू नैनावर एकतर्फी प्रेम करत असे. नैना दुसर्‍याशी लग्न करणार होती.  गुन्ह्यात वापरलेला चाकूही ताब्यात घेण्यात आला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद जिल्ह्यात १७ जून रोजी सायंकाळी १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा चाकू खुपसून हत्या करण्यात आली. तिने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागात ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी शेर खान उर्फ शेरू याला अटक केली आहे. पोलिसांनी शेरूवर २० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. अटक केलेला मारेकरी शेरू उर्फ शेराचे TIKTOK  व्हिडिओ लोकं खूप पसंत करतात. यूट्यूब आणि TIKTOK वर त्याचे सुमारे ४ लाख १० हजार फॉलोअर्स आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, शेरू नैनावर एकतर्फी प्रेम करत असे. नैना दुसर्‍याशी लग्न करणार होती. शेरूला नैना दुसर्‍या कुणाबरोबर राहायला नको हवी होती. १७ जून रोजी शेरू असा विचार करून नैनाकडे पोहोचला की, एकतर नैना त्याच्यासोबत येईल, नाही आली तर चाकू खुपसून तिला ठार मारेन. वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कलानिधी नैथानी यांनी सांगितले की, जखमी तरुणीला दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नैनाच्या हत्येनंतर पोलिसांनी शेरूच्या तीन साथीदारांना अटक केली, तर हत्या केल्यानंतर शेरू फरार होता. गाझियाबाद पोलिसांनी शेरूवर २० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते आणि पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.पुढे नैथानी यांनी सांगितले की, टीला मोड़ भागातील पंचशील कॉलनी येथून रविवारी रात्री पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने शेरू खान याला अटक केली. त्याला आश्रय देणाऱ्या त्याचा भाऊ इमरान आणि मेहुणा रिजवान यांनाही अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकूही ताब्यात घेण्यात आला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

 

मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

 

पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात

 

Sushant Singh Rajput suicide: रिया चक्रवतीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मैत्रिणीची झाली ९ तास चौकशी, अन्य काही जणांना पाठवले समन्स

 

कडक चहा न दिल्याच्या रागात पतीने केली गर्भवती पत्नीची हत्या

टॅग्स :ArrestअटकMurderखूनTik Tok Appटिक-टॉकPoliceपोलिसdelhiदिल्ली