Sushant Singh Rajput suicide: रिया चक्रवतीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मैत्रिणीची झाली ९ तास चौकशी, अन्य काही जणांना पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:43 PM2020-06-23T15:43:02+5:302020-06-23T15:45:55+5:30

राजपूतवर उपचार करणार्‍या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमधील  डॉ. केर्सी चावडा या मानसोपचार तज्ज्ञांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

Sushant Singh Rajput suicide: After Riya Chakraborty, Sushant's close friend 'Yaa' was interrogated for 9 hours, summons sent to some others | Sushant Singh Rajput suicide: रिया चक्रवतीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मैत्रिणीची झाली ९ तास चौकशी, अन्य काही जणांना पाठवले समन्स

Sushant Singh Rajput suicide: रिया चक्रवतीनंतर सुशांतच्या जवळच्या 'या' मैत्रिणीची झाली ९ तास चौकशी, अन्य काही जणांना पाठवले समन्स

Next
ठळक मुद्दे२० जूनपर्यंत पोलिसांनी १६ जणांची चौकशी केली होती. आता सोमवारी, २२ जून रोजी पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतची सर्वात जवळची मैत्रीण असलेल्या रोहिणी अय्यर हिची चौकशी केली.अय्यर वांद्रे पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता आली आणि चौकशी पथकाने ९ तासांहून अधिक वेळ राजपूतबाबत चौकशी केली.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आणखी तीन जणांचे जबाब नोंदवले आहेत. राजपूतचा मित्र सिद्धार्थ पितानी आणि जवळची मैत्रीण रोहिणी अय्यर यांची वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. अय्यर हिने राजपूतवर इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिलेली होती. यापूर्वी तिने त्याच्याबरोबर त्याच्या प्रसिद्धीचे कामकाज हाताळले होते.

अय्यर वांद्रे पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता आली आणि चौकशी पथकाने ९ तासांहून अधिक वेळ राजपूतबाबत चौकशी केली. तिचा जबाब नोंदविण्यात आला, तर या प्रकरणात सोमवारी पोलिसांनी इतर दोन जणांनाही समन्स बजावले आहेत. 


सुशांत सिंग राजपूत याने १४ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. बऱ्याच अहवालानुसार तो नैराश्याने ग्रस्त होता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याने आत्महत्यासारखे कठोर पाऊल उचलले. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. २० जूनपर्यंत पोलिसांनी १६ जणांची चौकशी केली होती. आता सोमवारी, २२ जून रोजी पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतची सर्वात जवळची मैत्रीण असलेल्या रोहिणी अय्यर हिची चौकशी केली.


मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी अय्यर सोमवारी सकाळी वांद्रे पोलीस ठाण्यात आली आणि दुपारनंतर तेथून निघाली. मात्र, रोहिणीने आपल्या जबाबत काय म्हटले आहे, याबद्दल माहिती मिळालेली नाही. परंतु, बर्‍याच अहवालात असे म्हटले आहे की, सुशांतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या  मैत्रीबद्दल अय्यरला प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर असेही बोलले जात आहे की, मुंबई पोलिसांनी सुशांत सिंगच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. 

राजपूतवर उपचार करणार्‍या मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमधील  डॉ. केर्सी चावडा या मानसोपचार तज्ज्ञांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, डॉ.चावडा यांनी व्यस्त कामकाजामुळे वांद्रे पोलिसांकडे हजर होण्यासाठी आणखी पुढील तारीख मागितली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

 

 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

 

मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

 

पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात

 

 

Read in English

Web Title: Sushant Singh Rajput suicide: After Riya Chakraborty, Sushant's close friend 'Yaa' was interrogated for 9 hours, summons sent to some others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.