शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

हिंजवडीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे निलंबन करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 7:37 PM

आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जमीन बळकाविण्यासाठी लँड माफियांना त्यांनी एजंट म्हणून मदत केली

ठळक मुद्देबालेवाडीतील ग्रामस्थांचे आंदोलन :  लँड माफियांची मदत केल्याचा आरोप 

वाकड : हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत जमीन बळकाविण्यासाठी 'लँड माफियां' ची एजंट म्हणून मदत केली, असा आरोप करत त्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी हिंजवडीतील साखरे कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन शुक्रवारी केले.पुण्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली दीड तास चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध असो, एजंट पीआयचे निलंबन करा, मांडोली अधिकाऱ्यांचे निलंबन करा, पिंपरी-चिंचवड पोलिसांचा निषेध, आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल (संपर्क हिंजवडी पोलीस ठाणे) अशा आशयाचे फलक घेतलेल्या तरुणांनी घोषणाबाजी केली. सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांच्याकडे याबाबतच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.  हिंजवडी येथे दि. १८ सप्टेंबर रोजी हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जमीन बळकाविण्यासाठी लँड माफियांना त्यांचा एजंट म्हणून मदत केली. तसेच विक्रम साखरे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी दिली. पोलीस खात्यातील गुंडगिरीचे हे उदाहरण आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन पीआय गवारे यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, असे निवेदनात नमूद केले आहे............... 

भावकीतील जागेचे हे भांडण आहे. पूर्वी दोन्हीही पक्षांना बोलावून कायदेशीर समज दिली होती. जागेची मोजणी करून झाली. प्रत्येकाच्या हद्द निश्चित झाल्या होत्या. त्यापैकी एकाने बांधकामास सुरुवात केल्याने भांडणे सुरू झाली. आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेलो आणि न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. तसेच कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची समज दिली. अटक कोणाला करायचे ते पाहू असेही म्हणलो. मात्र भावकीच्या भांडणात पोलिसांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला ह्यटार्गेटह्ण करण्यात येत आहे.- यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhinjawadiहिंजवडी