शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

बालविवाह प्रकरणी सहा जणांना अटक, डोंबिवलीतील सागर्ली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 10:25 PM

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे मानपाडा पोलिसांनी नवऱ्यासह त्याचे आणि नवरीकडील नातेवाईक अशा एकूण सहा जणांना गुरूवारी अटक केली.

ठळक मुद्देसहा जणांना अटक करून त्यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंध कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली:  येथील पुर्वेकडील सागर्ली परिसरात 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि 26 वर्षांचा तरुण यांचा बालविवाह त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गुपचूप संपन्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे मानपाडा पोलिसांनी नवऱ्यासह त्याचे आणि नवरीकडील नातेवाईक अशा एकूण सहा जणांना गुरूवारी अटक केली.    

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह अॅड. रंजना गवांदे यांना निनावी फोनद्वारे बालविवाहाची महिती मिळाली होती. त्यांनी ती माहिती अंनिस कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह आणि डोंबिवलीतील रहिवासी अॅड. तृप्ती पाटील यांना दिली. यात डोंबिवलीच्या मानपाडा भागातील एका सोसायटीच्या घरात बालविवाह होणार असल्याबाबत तसेच अल्पवयीन मुलगी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे, अशी माहिती पाटील यांना मिळाली.

पाटील यांनी याबाबत तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्याला कळवले. स्वत: अॅड. पाटील आणि अंनिसचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रा. प्रवीण देशमुख आणि परेश काठे यांच्यासह पोलिस अधिका-यांनी केलेल्या शोध मोहीमेत अपेक्षित असलेले ठिकाण सापडले. परंतू पोलीस आणि अंनिस कार्यकर्त्यांची धाड पडायच्या पूर्वीच सागर्ली गावातील एका सोसायटीतील एका घरात बालविवाह संपन्न झाला होता. 

दरम्यान, मानपाडा पोलिसांनी बालविवाह पार पाडण्यात जबाबदार असलेल्या नवरदेव सतीश जाधव याच्यासह त्याचे नातेवाईक आणि नवरी मुलीकडचे नातेवाईक अशा सहा जणांना अटक करून त्यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंध कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. निनावी फोनद्वारे माहिती देणा-याने संपूर्ण पत्ता दिला नव्हता म्हणून आम्हाला तत्काळ लग्नाचे ठिकाण शोधता आले नाही अन्यथा बालविवाह रोखण्यात यश आले असते, अशी माहिती अॅड. पाटील यांनी दिली.

आणखी बातम्या...

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली

टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...    

'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील    

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली