जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 07:08 PM2020-07-02T19:08:47+5:302020-07-02T20:14:39+5:30

अंबिका चौक येथील 13 मुलं काळमांडवी धबधब्यावर पोहोण्यासाठी गेली होती.

5 children drowned in Jawahar's Kalamandvi waterfall | जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली

Next
ठळक मुद्देधबधबा खूप मोठा व खोल दरीत आहे. येथे पावसाळ्यात खाली उतरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते.

- हुसेन मेमन

जव्हार : जव्हारहून सात किमी अंतरावर केळीचापाडा (काळशेती) येथील धबधब्यावर फिरायला गेलेल्या जव्हारमधील अंबिका चौक  येथील काही मुलांपैकी 5 मुलं बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.  या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या जव्हारमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे बाजरपेठ बंद आहे. त्यामुळे अंबिका चौक येथील 13 मुलं काळमांडवी धबधब्यावर पोहोण्यासाठी गेली होती, हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत आहे. येथे पावसाळ्यात खाली उतरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठे पाण्याचे डोह आहेत, मात्र तेथील काही मुलांना खोलीचा अंदाज न आल्यामुळे या डोहात एकाच वेळी 5 मुले बुडाले असल्याची घटना घडली.

निमेश पटेल, बाळा फलटणकर, दादू वाघ, प्रथमेश चव्हाण, रिंकू भोईर अशी बुडालेल्या पाच मुलांची नावे असून ही पाचही तरुण 18 ते 22 वयोगटातील आहेत. बुडालेल्या पाचही तरुणाचे मृतदेह सापडले आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालघर जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुनील भुसारा यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करीत आहेत.

आणखी बातम्या...

टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...    

'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील    

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद    

Web Title: 5 children drowned in Jawahar's Kalamandvi waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.