स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 08:08 IST2026-04-14T08:08:08+5:302026-04-14T08:08:08+5:30

Shree Swami Samarth Punyatithi Din 2026: स्वामींच्या स्मरण दिनी स्वामी पूजन कसे करावे? आवर्जून कोणता मंत्र म्हणावा? सविस्तर जाणून घ्या...

shree swami samarth punyatithi smaran din 2026 know how to do worship swami puja vidhi in marathi | स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता

स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता

Shree Swami Samarth Smaran Din 2026: बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीया हा स्वामींचा प्रकट दिन असतो. तर चैत्र महिन्याच्याच वद्य पक्षातील त्रयोदशीला अक्कलकोट येथे स्वामींची अवतारकार्याची सांगता केली. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.' असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ, हे अनेक श्रद्धाळुंचे श्रद्धास्थान. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. स्वामींच्या स्मरण दिनी स्वामी सेवा, पूजन कसे करावे? याबाबत जाणून घेऊया...

प्रकट दिनाप्रमाणेच स्वामींच्या स्मरण दिनी लाखो भाविक स्वामींच्या मठात जाऊन आवर्जून दर्शन घेतात. ज्यांना शक्य आहे, ते अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. ज्यांना मठात जाणे शक्य होत नाही, ते घरच्या घरी आपल्याला जमेल, तशी स्वामी सेवा करतात.  स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन शंभर वर्षांहून अधिक वर्षे उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वामींच्या स्मरण दिनी आवर्जून पूजन करावे, असे म्हटले जाते. आपल्या जशी जमेल, तशी स्वामी सेवा करावी, असे सांगितले जाते. 

स्मरण दिनी करायचा श्री स्वामी समर्थ पूजन विधी

- सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून शूचिर्भूत व्हावे. ज्या ठिकाणी पूजा करणार आहात, ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर स्वामी पूजनाचा संकल्प करावा. स्वामींचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. 

- स्वामींना अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे स्वामींना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. 

- शक्य असल्यास स्वामींची स्तोत्रे, श्लोक, मंत्रांचे जप करावेत. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी.

- स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावीत. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. पिवळ्या रंगाचा समावेश असलेली फुले, गोडाचा पदार्थ, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून स्वामींना अर्पण करावी. 

- किमान १०८ वेळा 'श्री स्वामी समर्थ' या मंत्राचा जप करावा. १०८ वेळा शक्य नसेल, तर शक्य आहे, तितका जप करावा. तसेच तारक मंत्र अवश्य म्हणावा.

- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. 

- स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे.

- स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी सेवा करत राहा.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

Web Title : स्वामी समर्थ स्मरण दिन 2026: पूजन विधि, स्वामी मंत्र और महत्व।

Web Summary : श्री स्वामी समर्थ स्मरण दिन 15 अप्रैल, 2026 को है। भक्त मठों में जाते हैं या घर पर पूजा करते हैं। फूल, मिठाई अर्पित करें और 'श्री स्वामी समर्थ' मंत्र का जाप करें। स्वामी के वादे पर विश्वास रखें: 'डरो मत, मैं तुम्हारे साथ हूं।'

Web Title : Swami Samarth Smaran Din 2026: Worship method, Swami mantra, and significance.

Web Summary : Shree Swami Samarth Smaran Din is on April 15, 2026. Devotees visit mathas or worship at home. Offer flowers, sweets, and chant 'Shree Swami Samarth' mantra. Believe in Swami's promise: 'Fear not, I am with you.'