पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:42 IST2026-04-14T09:40:18+5:302026-04-14T09:42:32+5:30
Rajasthan Jaipur pregnant woman Molestation: राजस्थानच्या जयपूरमध्ये एका गर्भवती महिलेसोबत दिवसाढवळ्या छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
राजस्थानच्या जयपूरमध्ये एका गर्भवती महिलेसोबत दिवसाढवळ्या छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली . या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. तर, याप्रकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका एएसआयसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. व्हिडीओच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून त्याचा शोध सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास जयपूरमधील जवाहर सर्कल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मालवीय नगर परिसरात घडली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक गर्भवती महिला फोनवर बोलत एका गल्लीतून पुढे जात आहे. तर, आरोपी तिचा पाठलाग करताना दिसत आहे. पुढील सीसीसीटी कॅमेऱ्यात आरोपी तिला मागून पकडतो आणि तिच्याशी घाणेरडे कृत्य करतो. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरते आणि आरडाओरडा करते. पीडित महिलेने आरोपीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी तिला जमिनीवर पडलेल्या विटेचा धाक दाखवतो. त्यामुळे पीडित महिला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाते.
يتسلل المـ ـنحرف خلف امرأة حامل ثم يقوم بالتـ ـحرش بها في وضح النهار
— ABDULRHMAN🚔| عبدالرحمن (@Aaaxxxx) April 13, 2026
قدمت الضـ ـحية شكوى في مركز شرطة جاواهار في الهند في اليوم التالي للحادثة، 26 مارس
لكن الشرطة أبدت إهمالاً، والآن بعد انتشار الفيديو، الذي اثار الكثير من
الغـ ـضب قامت الشرطة بإتخاذ الإجراءات pic.twitter.com/nZBFaQdxoH
पोलिसांचा निष्काळजीपणा आणि कारवाई
धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना घडून १८ दिवस उलटले तरी स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. २६ मार्च रोजी पीडित महिलेने कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले. या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल ड्युटी ऑफिसर एएसआय महेश चंद आणि हेड कॉन्स्टेबल अंगद राम यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, जवाहर सर्कल पोलीस ठाण्याचे प्रभारी आशुतोष सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आरोपीचा शोध सुरू
पोलिसांनी आता या प्रकरणी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात आरोपीचे नाव राज गुर्जर असल्याचे समोर आले असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. तो मालवीय नगरमधील एका स्पा सेंटरमध्ये काम करत असल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही त्याने अनेक महिलांसोबत अशा प्रकारची कृत्ये केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे जयपूरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.