बापरे ! 'त्या'ने १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 20:40 IST2020-08-05T20:39:20+5:302020-08-05T20:40:07+5:30

अशाप्रकारच्या धमक्या देत आरोपी फिर्यादी यांच्यावर आणतोय घटस्फोटासाठी दबाव

Shocking.! 100 cut peaces of bodies and put in fridge threating to women | बापरे ! 'त्या'ने १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची दिली धमकी

बापरे ! 'त्या'ने १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची दिली धमकी

पुणे : घटस्फोट देण्यासाठी त्याने आपल्या पत्नी व मुलांना जिवे मारुन तुमचे १०० तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवीन अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
हडपसर पोलिसांनी पती सिद्धार्थन व्ही. पी. (वय ४२, रा. तंजावरु, तामिळनाडु), पनीर माथोर, वडीवग्गाल व्ही पी (वय ६३) व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी फुरसुंगी येथे राहणाऱ्या एका ४३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा सिद्धार्थन यांच्याबरोबर २०१० मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर माहेरुन पैसे घेऊन ये म्हणून तिला वारंवार मारहाण व शिवीगाळ करुन छळ केला गेला. बंगलुरु, इंदौर, पटकोटाई व पुणे येथे राहत असताना हा छळ केला गेला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मुलांना सोडून तो निघून गेला आहे.त्यानंतर त्याने फिर्यादी व मुलांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी न घेता फिर्यादी यांनी घटस्फोट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे़. सिद्धार्थन याने फिर्यादी यांना तुला व तुझ्या मुलांना जीवे मारुन तुमचे १०० तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवेन अशी धमकी दिली. त्यामुळे आता या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Web Title: Shocking.! 100 cut peaces of bodies and put in fridge threating to women