शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

६ दिवसांच्या मुलीला करोडपती दाम्पत्याने १ लाखात विकत घेतलं, २ वर्षांनंतर रस्त्याच्या कडेला फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:22 IST

२ वर्षांच्या चिमुकलीच्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्योपूर पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली आहे.

नॅशनल हायवे-५५२ वर सोईकलां जवळ सापडलेल्या २ वर्षांच्या चिमुकलीच्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्योपूर पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये इंदूरमधील महालक्ष्मी नगरमध्ये ब्युटी पार्लर चालवणारी नीता जैन, तिचा पती वैभव जैन, आकाश मुंदडा आणि त्याची पत्नी कृतिका मुंदडा यांच्यासह धार आणि खरगोन येथील दोन महिलांचा समावेश आहे.

या प्रकरणात अद्याप सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की, या चिमुकलीचे खरे आई-वडील कोण आहेत? सध्या पोलीस या दुव्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. मात्र श्योपूरचे पोलीस अधीक्षक सुधीर अग्रवाल यांनी सांगितलं की, लवकरच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला जाईल. तपासात असं समोर आलं आहे की, या मुलीचा सौदा २१ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला होता, जेव्हा ती अवघ्या ६ दिवसांची होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धार जिल्ह्यात क्लिनिक चालवणाऱ्या एका महिलेकडून ही मुलगी विकत घेण्यात आली होती. तिने ही मुलगी खरगोनमधील दुसऱ्या एका महिलेकडून घेतल्याचं सांगितलं. यानंतर इंदूरमधील नीता जैन आणि तिचा पती वैभव जैन यांच्या माध्यमातून राजगढमधील व्यापारी आकाश मुंदडा याला १ लाखाला ही मुलगी विकण्यात आली. 

३५ तासांत ३ जिल्ह्यांत छापे, ६ आरोपींना अटक

मानवी तस्करीचं प्रकरण समोर येताच पोलीस अधीक्षकांनी एकाच वेळी ३ विशेष पथकं तयार केली. या ऑपरेशनमध्ये २० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पहिलं पथक इंदूरला पोहोचलं, तिथून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे धार आणि खरगोन जिल्ह्याच्या सीमेवरून दोन महिलांना पकडून श्योपूरला आणण्यात आलं. असं सांगितलं जात आहे की, हा भाग इंदूरला लागूनच होता आणि हे सर्वजण इंदूरच्या महालक्ष्मी नगर परिसरातच राहायचे. ब्युटी पार्लरच्या माध्यमातून या सर्वांचे एकमेकांशी संबंध आले होते.

पोलिसांनी दाम्पत्याला केली अटक 

या प्रकरणाची सुरुवात १८ एप्रिल रोजी हायवेच्या कडेला ही मुलगी सापडल्यानंतर झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा एक कार (MPC7 ZA 0067) संशयास्पद वाटली. इतर वाहनांच्या तुलनेत या कारचा वेग कमी होता, ज्यामुळे हीच कार थांबून पुढे गेल्याचा संशय बळावला. येथूनच पोलिसांना सुगावा लागला आणि कार मालकाचा शोध घेतला असता, तो कोट्यधीश व्यापारी आकाश मुंदडा असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. 

पार्लरच्या माध्यमातून झाली ओळख

पोलीस तपासात या प्रकरणाचे धागेदोरे इंदूरच्या महालक्ष्मी नगरशी जोडलेले आढळले आहेत, जिथून हे संपूर्ण नेटवर्क चालवलं जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. येथे ब्युटी पार्लरच्या नावाखाली मुलीचा सौदा झाला होता, कारण खरेदीदारापासून ते विक्रेत्यापर्यंत सर्वजण पार्लरच्या माध्यमातूनच एकमेकांना भेटले होते. त्यानंतर ६ दिवसांच्या या चिमुकलीचा सौदा झाला.

मेडिकल कनेक्शनचा तपास

आता पोलीस या प्रकरणातील 'मेडिकल कनेक्शन'ची चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी अनेक जण वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत, ज्यामध्ये एक महिला क्लिनिकही चालवते. पोलीस २१ नोव्हेंबर २०२४ च्या आसपासचे डिलिव्हरी रेकॉर्ड, जन्म नोंदणी आणि डिस्चार्ज एंट्री तपासत आहेत. इतक्या लहान वयातील बाळ रुग्णालयाबाहेर कसं आले, याचा तपास सुरू आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही, असं अधिकाऱ्यांचं मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Infant Sold for Profit, Abandoned: Couple Arrested in Trafficking Case

Web Summary : A couple bought a 6-day-old infant for profit, then abandoned her. Police arrested six individuals, including the couple and medical professionals, exposing a trafficking network operating through a beauty parlor. The investigation focuses on identifying the child's parents and the medical connection.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस