शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला सात वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:10 IST

लग्नाचे प्रलोभन दाखवून एका मागासवर्गीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणा-या नवीनकुमार प्रेमशंकर तिवारी (३१) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा शनिवारी ठोठावली आहे.

ठाणे : लग्नाचे प्रलोभन दाखवून एका मागासवर्गीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणा-या नवीनकुमार प्रेमशंकर तिवारी (३१) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा शनिवारी ठोठावली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही एका वर्षाच्या कारावासाची तसेच ३५ हजारांच्या दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रहिवासी नवीनकुमार याचे मागासवर्गीय युवतीसोबत पाच वर्षांपूर्वी प्रेम जुळले होते. हे दोघेही कुर्ला येथील एका कॅटरिंगमध्ये काम करीत होते. तिथेच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून मुंब्रा कॉलनी येथील एका भाड्याच्या घरात ठेवले. पती-पत्नीप्रमाणे वास्तव्य करून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. प्रत्यक्ष लग्नाचे नाव तिने काढल्यानंतर मात्र तो तिला टाळाटाळ करीत होता. तेंव्हा तिने त्याच्या खोपोली येथील घरी जाऊन त्याच्या आईवडिलांकडे आपली कैफियत मांडली. त्यांनीही उच्चवर्णीय असल्यामुळे तिच्याशी मुलाचे लग्न लावून देण्यात असमर्थता दर्शविली. अखेर तिने या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे नवीनकुमारसह त्याच्या आईवडिलांविरुद्ध तक्रार केली. आयोगाने हे प्रकरण मुंब्रा पोलिसांकडे वर्ग केले. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी २०१४ मध्येच तिघांनाही अटक केली. त्यानंतर या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.न्यायालयाने केली आईवडिलांची निर्दोष मुक्तताया खटल्याची १८ जानेवारी २०२० रोजी अंतिम सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीस कडक शिक्षा करण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व साक्षी-पुरावे तसेच मुंब्रा पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारावर ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जी.पी. शिरसाट यांनी साक्षी-पुरावे ग्राह्य मानून नवीनकुमार याला लैंगिक अत्याचार कलम ३७६ अंतर्गत सात वर्षे कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडामधील ३० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्याच्या आईवडिलांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे या खटल्याकडे न्यायालयातील वकील, पोलीस आणि पीडितेच्या नातेवाइकांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय