शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नेव्हल कॉलनीत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 18:07 IST

कफपरेड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद 

ठळक मुद्देया अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास कफ परेड पोलीस आणि नौदल अधिकाऱ्यांद्वारे सुरू आहे.

मुंबई - आज दुपारच्या सुमारास कुलाबातील नौदल निवासी कॉलनीत घरकाम करणाऱ्या महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. आरती दशरत परदेशी (४५) असं या मृत महिलेचं नाव आहे. नौदल निवासी कॉलनीतील एका बहुमजली इमारतीच्या दोन मजल्यांमधील लिफ्टच्या शाफ्टमध्ये अचानक अडकली आणि या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आज दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास विजया अपार्टमेंट, आर. सी. चर्च, नोफ्रा, कुलाबा या ठिकाणी आरती दशरथ परदेशी या तिसऱ्या मजल्यावरून पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जात असताना त्यांचा पाय आणि शरीर लिफ्ट आणि भिंत यामध्ये अडकल्यामुळे त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले.आपत्कालीन सेवांकरिता तात्काळ पाचारण करण्यात आले आणि पोलिसांच्या उपस्थितीत लिफ्टचे दरवाजे उघडण्यात आले. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास कफ परेड पोलीस आणि नौदल अधिकाऱ्यांद्वारे सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिलाMumbaiमुंबईPoliceपोलिस