शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

खिशातला चष्मा डोळ्यांना लावताच चौकीदार एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 17:24 IST

एसीबीची कारवाई : गाळ्याचा कर कमी करण्यासाठी घेतली लाच

ठळक मुद्देविलास पाटील याला अटक करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेवरच पंचासमक्ष पंचनामा करुन पाटील याला अटक करण्यात आली.आरोपीने ही रक्कम स्विकारली की नाही याबाबत प्रत्येक वेळी सांकेतिक शब्द किंवा कृतीचा वापर केला जातो.

जळगाव - खिशात ठेवलेला चष्मा डोळ्यांना लावताच काम फत्ते झाले या गोपनीय कृतीप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मनपाचा चौकीदार विलास भिका पाटील (५५) याला चार हजार रुपयांची लाच स्विकारताना मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. रामानंद नगरातील गिरणा पाण्याच्या टाकीजवळील मनपाच्या कार्यालयात हा सापळा रचण्यात आला. दरम्यान, विलास पाटील याला अटक करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा पिंप्राळा परीसरात दुकान (गाळा) असून या दुकानाचा कर कमी करण्याच्या मोबदल्यात विलास पाटील याने तक्रारदाराकहे चार हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी रामानंद नगरातील गिरणा पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावला होता.  

आरोपीने ही रक्कम स्विकारली की नाही याबाबत प्रत्येक वेळी सांकेतिक शब्द किंवा कृतीचा वापर केला जातो. आजच्या कारवाईत तक्रारदाराने खिशात चष्मा ठेवायचा. आरोपीने पैसे स्विकारले तर चष्मा डोळ्यांना लावायचा, नाही स्विकारली तर चष्मा लावायचा नाही असे ठरले होते. विलास पाटील याने चष्मा लावताच उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, कर्मचारी मनोज जोशी, प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, व सुरेश पाटील यांनी त्याला रंगेहाथ पकडले. जागेवरच पंचासमक्ष पंचनामा करुन पाटील याला अटक करण्यात आली.

टॅग्स :ArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMuncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव