शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसाय; दोघांना अटक, पीडितेची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:50 IST

वरसोली येथील लोट्स लॉजिंगवर अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना सोमवारी संध्याकाळी गोपनीय सुत्रांकडून मिळाली होती.

काही महिन्यांपूर्वी अलिबाग शहरात वेश्या व्यावसाय करणाऱ्या नवरा-बायकोला अटक केल्यानंतर आज पुन्हा वरसोली येथील लोट्स लॉजिंग येथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अलिबाग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, वेश्या व्यवसायासाठी असलेल्या पीडितेला पोलिसांनी ताब्यात घेत महिला सुधारगृहात पाठवले आहे. वरसोली येथील लोट्स लॉजिंगवर अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना सोमवारी संध्याकाळी गोपनीय सुत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करीत ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सत्यभामा खरात, पोलीस हवालदार जयेंद्र पाटील, परेश म्हात्रे, महिला पोलीस हवालदार मयुरी जाधव, पो.शिपाई शुभम नांदगावकर, अनिकेत पाटील, अनिकेत ढिवरे, सुनिल जाधव यांचे पथक तयार करण्यात  होते. कारवाईसाठी दोन महिलांना पंच म्हणून पाचारण करण्यात आले होते. 

एक बनावट ग्राहक तयार करून देह विक्रीचा व्यवसाय चालू असल्याची खात्री करून, खात्री झाल्यास पोलीसांना सांकेतिक इशारा दिला. त्यानंतर तात्काळ पोलीस पथकाने धाड मारून तेथे वेश्या व्यवसायासाठी आलेल्या पीडित मुलीला मुक्त केले. यामध्ये राजेश रामलखन चौपाल व जोत्स्ना दास यांचे विरोधात पोलीस शिपाई अनिकेत ढिवरे यांनी फिर्याद दाखल केली होती. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३,३ (५) सह अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनीयम १९५६ चे कलम ३,४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, यांचे मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांच्या टिमने यशस्वी केली आहे.

टॅग्स :alibaugअलिबागCrime Newsगुन्हेगारी