शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:10 IST

पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशातील इंदौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका २१ वर्षीय युवतीने, इरफान अली उर्फ हैप्पी अली उर्फ हैप्पी पंजाबीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती गर्भपात केल्याचे गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. विजयनगर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

संबंधित पीडित तरुणी मुळची राजस्थानची रहिवासी आहे, ती निपानिया येथे भाड्याच्या घरात राहत होती आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, "मे २०२३ मध्ये आरोपीने 'हैप्पी पंजाबी' असे नाव सांगून स्वतःची ओळख करून दिली. यानंतर, नोकरीचे आमिष दाखवून तिला एका हॉटेलवर बोलावले आणि कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ टाकून बेशुद्ध केले. जेव्हा सकाळी जाग आली, तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिच्या लक्षात आले. याचा विरोध केल्यानंतर, हॅप्पी म्हणाला, तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओही तयार केले आहेत. यानंतर तो तिला ब्लॅकमेल करू लागला. तिच्या रूमवर जाऊन, तिला ते फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमकावू लागला आणि वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला." 

पीडितेने पुढे म्हटले म्हटले आहे की, २०२४ मध्ये हॅप्पी मला कुठे तरी घेऊन जात होता. दरम्यान, विजयनगर भागात आरोपीचा एका ऑटो चालकाशी वाद झाला. तेव्हा त्याची खरी ओळख इरफान असल्याचे मला समजले. विरोध केला असता तो म्हणाला, 'मी मुस्लीम आहे, तुलाही मुसलमान व्हावे लागेल.' या प्रकरणानंतर,  यानंतर पीडिता राजस्थानला गेली, पण जानेवारी २०२५ मध्ये इंदौरला परतल्यावर पुन्हा ब्लॅकमेलिंग आणि धार्म बदलण्यासंदर्भात दबाव सुरू झाला. 

जून २०२५ मध्ये आरोपीने तिला देवास येथे एकांत फ्लॅटमध्ये कैद करून अनेकदा बलात्कार केला, यामुळे ती गर्भवती झाली. नंतर जबरदस्ती औषध देऊन गर्भपात करवला, यामुळे तिची तब्येतही खालावली. त्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये  तिच्यावर शेवटचा बलात्कार केला. समाजाच्या भीतीने तिने आतापर्यंत तक्रार नोंदवली नव्हती. मात्र, कुटुंबीयांना सांगितल्यानंतर, करणी सेनेच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

इरफान, कलमा आणि मुस्लिम प्रार्थना (मुस्लीम दुआ) पठण करवत होता. पाठांतर होत नसल्याने मारझोड करायचा. रोजा ठेवण्याचा आणि बुरखा घालण्यास बळजबरी करायचा. नकार दिल्यास, 'तू मला ओळखत नाहीस, जास्त हुशारी केली तर, जीव घेईन', अशी धमकी देत होता. सिगारेटचे चटके, मारहाण, डोक्याला दुखापत आणि हातावर जखमाही आहेत, असेही पीडितेने म्हटले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, इरफान अलीवर १५ हून अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. त्याला जिल्हा तडीपारही करण्यात आले आहे. त्याच्यावर रासुकाही लावण्यात आला आहे. तो इंदूरमध्ये ड्रग्स पार्ट्या आयोजित करतो आणि अश्लील व्हिडिओ बनवून निर्दोष मुलींना ब्लॅकमेल करतो. त्याच्यावर बलात्कार, ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी दबाव आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणMuslimमुस्लीम