Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:58 IST2025-06-10T16:58:46+5:302025-06-10T16:58:59+5:30

Raj Kushwaha And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं.

raja raghuvanshi murder case sonam raghuvanshi raj kushwaha planing police indore | Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन

Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी राजाच्या हत्येनंतर अत्यंत हुशारीने पुढचं प्लॅनिंग केलं होतं. पण पोलिसांनी दोघांचाही प्लॅन अगदी सहजपणे उधळून लावला. पोलिसांनी अशी ट्रिक वापरून पाहिली की सोनमने सर्वच खरं सांगितलं. 

सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी राज कुशवाहाला अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं.

सोनम आणि राजचा प्लॅन होता की, सोनम गाझीपूरमध्ये अशा स्थितीत सापडेल की तिला लुटण्यात आलं आहे आणि तिचा नवरा मारला गेल्याचं दाखवलं जाईल. दरोडेखोरांनी मला इथेच सोडलं असं सांगायला सांगितलं. सोनमने ढाबा मालकाला हेच सांगितलं होतं. सोनम आणि राज यांनी असा प्लॅन केला होता की, मी अशा प्रकारे कुटुंबासमोर येईन, जेणेकरून कोणीही आपल्यावर संशय घेणार नाही. पण पोलिसांच्या ट्रिकने प्लॅन फेल झाला. 

सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

सोनमने आपल्या बॉयफ्रेंडसह मिळून राजा रघुवंशीची हत्या केली. यानंतर आता राज कुशवाहच्या बहिणीने धक्कादायक दावा केला आहे. माझा भाऊ हे करू शकत नाही असं म्हटलं आहे. तसेच राजची बहीण आणि आईने मीडियाला सांगितलं की, राजला कट रचून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो हे अजिबात करू शकत नाही.
 

Web Title: raja raghuvanshi murder case sonam raghuvanshi raj kushwaha planing police indore