शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून ३६ लाखांचे मोबाइल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 01:58 IST

मध्य रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या हाताला फटका मारून मोबाइलचोरीच्या घटना वाढल्या आहेत.

डोंबिवली : मध्य रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या हाताला फटका मारून मोबाइलचोरीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे पोलिसांनी सापळा लावला. रुळांमधून चालत येणाऱ्या चार जणांनी पोलिसांना पाहताच त्यांच्याकडील बॅगा तेथेच फेकून पळ काढला. या बॅगांमध्ये ३५ लाख ८५ हजार किमतीचे एकूण १९४ मोबाइल सापडल्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी. शार्दुल यांनी सांगितले. याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार बी.एच. भोईनवाड आणि एन.पी. मान हे पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून होते. सकाळी ८.४५ वाजता कल्याणहून विठ्ठलवाडीच्या दिशेने रेल्वे रुळांतून चालत येणाºया चार जणांना पोलिसांनी हटकताच त्यांनी त्यांच्याकडील दोन छोट्या बॅगा आणि एक लगेज बॅग तेथील गवतात टाकून कोळसेवाडीच्या दिशेने पळ काढला. या बॅगा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून तपासल्या असता त्यात १९४ मोबाइल आढळून आले. त्यांची एकत्रित किंमत ३५ लाख ८५ हजार १०६ रुपये असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोबाइलच्या मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी चौकशी केली असता नारपोली येथे मोबाइल फोनसंदर्भात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली असून त्या दिशेने तपास सुरूअसल्याचे शार्दुल यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली