शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:35 IST

Crime Delhi : ही महिला गेल्या तीन वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय अर्जुन नावाच्या अविवाहित तरुणाच्या प्रेमात होती.

एकीकडे नात्यांना काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत, तर त्यातून गुन्हेही घडत आहेत. आता एका अशाच धक्कादायक घटनेत, पाच मुलांची आई असलेल्या विवाहित महिलेची तिच्या अविवाहित प्रियकरासोबतच्या भांडणात हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित नसून, त्यात प्रेम, विश्वासघात आणि एका कुटुंबाच्या विनाशाची करुण कहाणी दडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे बदायूं जिल्ह्यातील सतीश हे त्यांची पत्नी नीरज आणि पाच मुलांसह मामुरा गावात एका भाड्याच्या घरात राहत होते. सतीश एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी नीरज गेल्या तीन वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय अर्जुन नावाच्या अविवाहित तरुणाच्या प्रेमात होती. अर्जुन सेक्टर-५९ येथील एका खाजगी कंपनीत हाऊस कीपिंगचे काम करतो. सतीश यांना नीरज आणि अर्जुन यांच्यात केवळ बोलचाल असल्याची माहिती होती.

कशावरून सुरू झाला वाद?सोमवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजता नीरज अर्जुनला भेटायला त्याच्या खोलीत गेली होती. तिथे त्यांच्यात संबंध तोडण्यावरून वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर अर्जुनने नीरजला मारहाण केली. या मारहाणीत नीरज बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. अर्जुन घाबरला आणि त्याने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथून तिला कैलास रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिच्या स्थितीत सुधारणा न झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रियकर अर्जुनला ताब्यात घेतले. नीरजच्या कुटुंबीयांनी अर्जुनने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे.

१३ वर्षांपूर्वी झाले होते लग्न, पाच मुलांची होती आई!पोलिसांनी सांगितले की, नीरजचे लग्न १३ वर्षांपूर्वी सतीशसोबत झाले होते. त्यांना पाच मुले आहेत. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतीश पाच वर्षांपूर्वी मूळ गावाहून नीरजला घेऊन नोएडाला आले होते. इथे राहत असताना त्यांची ओळख शेजारी राहणाऱ्या अर्जुनशी झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमसंबंधात बदलली. अर्जुन अविवाहित असून त्याचे वय २४ वर्षे आहे.

या घटनेमुळे नीरजच्या पाच मुलांचे आणि पतीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीhusband and wifeपती- जोडीदार