शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ऑनर किलिंग! ​​​​​​​प्रेमविवाहामुळे संतापलेल्या बापाचा आई झालेल्या मुलीवर बलात्कार, गळा दाबून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 4:05 PM

यासंदर्भात, पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, मृत महिलेने गेल्या वर्षापूर्वी प्रेम विवाह केल्याचे समोर आले, यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त होते. 

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील समसगड जंगलात एक महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला. यानंतर, पोलिसांनी धक्कादाक खुलासा केला आहे. संबंधित महिलेचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता आणि हा बलात्कार करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून खुद्द तिचा बापच होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

रातीबड टीआय सुदेश तिवारी यांनी म्हटले आहे, की दोन दिवसांपूर्वी समसगडच्या जंगलात एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, हा मृतदेह सिहोर जिल्ह्यातील बिल्किसगंज येथील महिलेचा असल्याचे आणि संबंधित मृत मुलगा तिचा मुलगा असल्याचे समोर आले.

यासंदर्भात, पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, मृत महिलेने गेल्या वर्षापूर्वी प्रेम विवाह केल्याचे समोर आले, यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त होते. 

बलात्कारानंतर महिलेची हत्या -यासंदर्भात पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता वडिलांचा संशय आला. यानंतर कसून चौकशी केल्यानंतर वडिलांनी गुन्ह्या कबूल केला. तिवारी यांनी सांगितल्यानुसार, चौकशीत आरोपी वडिलांनी म्हटले आहे, की त्यांच्या मुलीने लव्ह मॅरीज केले होते. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने गावातील लोक टोमने मारत होते. 

संबंधित मुलगी लग्नापासून घरी आलीच नव्हती. मात्र, या दिवाळीला ती त्याच्या (आरोपीच्या) मोठ्या मुलीसोबत घरी आली होती. यातच तिच्या 8 महिन्याच्या मुलाचा आजाराने मृत्यू झाला. या सर्व दुःखाच्या परिस्थितीत मोठ्या मुलीने तिच्या वडिलांना फोन करून याची माहिती दिली. यानंतर तिचे वडील आपल्या मुलाला घेऊन रातीबड येथे पोहोचले आणि संबंधीत चिमुकल्याचा मृतदेह दफन करण्यासाठी ते मुलीला घेऊन समसगडच्या जंगलात गेले. येथेच त्यांचा मुलीसोबत प्रेम विवाहावरून वाद झाला. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. आरोपी बापावर आयपीसी कलम 302, 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग