धक्कादायक! हवी ती मुलगी मिळाली नाही म्हणून रोडरोमिओने मांत्रिकाची केली हत्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:48 IST2021-01-20T09:46:44+5:302021-01-20T09:48:34+5:30

रूडकीच्या रामपूर गावात गेल्या १६ जानेवारीला उशीरा रात्री काही अज्ञात बाइकस्वारांनी एका वयोवृद्धावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

Lover man murder tantric person for money Uttarakhand | धक्कादायक! हवी ती मुलगी मिळाली नाही म्हणून रोडरोमिओने मांत्रिकाची केली हत्या....

धक्कादायक! हवी ती मुलगी मिळाली नाही म्हणून रोडरोमिओने मांत्रिकाची केली हत्या....

(Image Credit : Jagran.com)
उत्तराखंडच्या रूडकीमधून एक हत्येची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका मांत्रिका वर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, एका तरूणाने आवडती मुलगी मिळवण्यासाठी आणि तिला आपल्या तालावर नाचवण्यासाठी त्याने मांत्रिकाला पैसे दिले होते. पण जेव्हा तरूणाच्या लक्षात आलं की, त्याचे पैसे बुडत आहेत त्याने मांत्रिकाची हत्या केली.

रूडकीच्या रामपूर गावात गेल्या १६ जानेवारीला उशीरा रात्री काही अज्ञात बाइकस्वारांनी एका वयोवृद्धावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या प्रकऱणाची चौकशी करण्यासाठी हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तीन टीम तयार केल्या होत्या. 

१६ जानेवारी रोजी काही अज्ञात व्यक्तींनी इरफान नावाच्या वयोवृद्धाची गोळी मारून हत्या केली होती. यानंतर जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि चार तरूणांना अटक केली गेली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार बाइक आणि १ पिस्तुल ताब्यात घेतलं. 

या प्रकरणाबाबत एसएसपी हरिद्वार डी. सेंथिल अबुदई यांनी सांगितले की, मृत व्यक्ती मांत्रिक विद्येचं काम करत होती. आरोपींनी एका तरूणीला वश करण्यासाठी मांत्रिकाला काही पैसे दिले होते. पण काम न झाल्याने तरूणाने पैसे परत मागितल्यावर त्यांच्यात वाद झाला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एकाच्या वडिलांचा यादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे एका आरोपी त्या मांत्रिकाला मानत होता.

नंतर तरूणाने मांत्रिकाची हत्या करण्याचा प्लॅन केला. आणि दोन बाइकवरून १६ जानेवारीला रात्री उशीरा मांत्रिकावर गोळ्या झाडल्या. एसएसीनी सांगितले की, उपचारादरम्यान मांत्रिकाचा मृत्यू झाला. आता आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 
 

Web Title: Lover man murder tantric person for money Uttarakhand