कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:02 IST2026-04-15T14:59:19+5:302026-04-15T15:02:52+5:30

कानपूरमधील किडनी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Kanpur kidney racket exposed, girlfriend's mistake not overlooked and criminal caught! | कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!

कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!

कानपूरमध्ये समोर आलेल्या 'किडनी रॅकेट'ने माणुसकीला काळीमा फासला आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चालणाऱ्या या टोळीने चक्क मानवी अवयवांची तस्करी करण्यासाठी स्वतःची वेगळी सांकेतिक भाषा तयार केली होती. या सिंडिकेटचा मास्टरमाईंड रोहित याच्या अटकेनंतर समोर आलेल्या माहितीने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

कोडवर्डमध्ये लपलेले काळे धंदे

तपास यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी या टोळीने एक समांतर भाषा विकसित केली होती. या नेटवर्कमध्ये किडनी प्रत्यारोपणाला ‘कमांडो सर्जरी’ असे म्हटले जायचे. ज्या रुग्णालयांमध्ये हे अवैध प्रकार चालायचे, त्यांना ‘स्कूल’ किंवा ‘कॉन्व्हेंट’ अशी नावे दिली होती. उदा. आहूजा हॉस्पिटलला ‘आहूजा स्कूल’ आणि प्रिया हॉस्पिटलला ‘प्रिया कॉन्वेंट’ असे संबोधले जायचे. इतकेच नाही तर रुग्ण आणि डोनरसाठीही कोडवर्ड होते. पुरुष रुग्णाला ‘पांव’ आणि महिला रुग्णाला ‘पोला’ म्हटले जायचे. या रॅकेटमधील डॉक्टरांनाही ‘चौघड़ पांव’ आणि ‘चौघड़ पोला’ असे कोडवर्ड देण्यात आले होते.

रिसेप्शनिस्ट ते गुन्हेगारीचा सम्राट

या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार रोहित हा एकेकाळी गाझियाबादमध्ये मजुरी करायचा. त्यानंतर तो मेरठच्या एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून लागला. तिथेच त्याची ओळख किडनी रॅकेटमधील लोकांशी झाली. व्हाईट कॉलर गुन्हेगारीच्या या जगाची सर्व गुपिते आत्मसात केल्यावर, २०१९ मध्ये त्याने कानपूरला आपले केंद्र बनवले आणि अवैध ट्रान्सप्लांटचे स्वतःचे साम्राज्य उभे केले.

सोशल मीडियाचा हायटेक वापर

रोहित स्वतः कधीही थेट कोणाच्या संपर्कात येत नसे. रुग्णांना शोधण्यासाठी 'मार्शल' नावाच्या एजंटचा वापर केला जायचा. तर दुसरीकडे, पैशांची गरज असलेल्या गरिबांना फसवण्यासाठी टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जात असे. आर्थिक तंगी असलेल्या लोकांना जाळ्यात ओढून त्यांना कानपूरला आणले जायचे आणि त्यांची 'कमांडो सर्जरी' केली जायची.

एका किडनीसाठी ६० लाखांची डील

हा काळा बाजार किती मोठा होता, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की एका किडनी ट्रान्सप्लांटसाठी ३० ते ६० लाख रुपयांचा सौदा व्हायचा. यातील ५० टक्के हिस्सा थेट रोहितच्या खिशात जात असे. या पैशाच्या जोरावर तो अत्यंत आलिशान जीवन जगत होता. गुन्हा केल्यानंतर तो अनेकदा गोव्यासारख्या शहरांत ऐश करण्यासाठी निघून जायचा.

गर्लफ्रेंडचा एक कॉल अन् गेम खल्लास!

रोहित आपली ओळख लपवण्यासाठी सतत मोबाईल नंबर बदलत असे. मात्र, फरार असताना त्याने आपल्या प्रेयसीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि हीच त्याची मोठी चूक ठरली. पोलिसांनी सर्व्हिलन्सच्या मदतीने तो नंबर ट्रॅक केला आणि अखेर त्याला बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले असले, तरी मेरठचे काही डॉक्टर आणि ओटी स्टाफ अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

Web Title : कानपुर किडनी रैकेट का पर्दाफाश: गर्लफ्रेंड की गलती से हुई गिरफ्तारी

Web Summary : कानपुर में किडनी रैकेट, जो अवैध प्रत्यारोपण के लिए गुप्त भाषा का उपयोग करता था, का भंडाफोड़ तब हुआ जब सरगना की गर्लफ्रेंड का कॉल ट्रेस किया गया। रोहित ने गरीबों का शोषण करके साम्राज्य बनाया, लेकिन उसका प्यार उसके पतन का कारण बना, जिससे उसकी गिरफ्तारी हुई और नेटवर्क ध्वस्त हो गया।

Web Title : Kanpur Kidney Racket Busted: Girlfriend's Mistake Leads to Arrest

Web Summary : Kanpur's kidney racket, using code words for illegal transplants, was exposed after the mastermind's girlfriend's call was traced. The leader, Rohit, built an empire exploiting the poor, but his love proved his downfall, leading to his arrest and dismantling of the network.