खळबळजनक! LPG तुटवड्यादरम्यान झाशीतून ५२४ गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:54 IST2026-03-10T16:53:54+5:302026-03-10T16:54:58+5:30

उत्तर प्रदेशातील झाशी येथून गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

jhansi lpg cylinder truck theft 524 cylinders missing amid iran war supply concern | खळबळजनक! LPG तुटवड्यादरम्यान झाशीतून ५२४ गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला

फोटो - आजतक

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्याबाबत जगभरात चिंतेचं वातावरण आहे. युद्धामुळे तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील झाशी येथून गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये सुमारे ५२४ भरलेले एलपीजी गॅस सिलिंडर होते, ज्यांची किंमत अंदाजे १८ लाख रुपये सांगितली जात आहे. हे प्रकरण झाशीच्या सीपरी बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. ट्रक मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ट्रक मालक नीरज अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीसार, त्यांचा ट्रक झाशीच्या करारी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या प्लांटशी जोडलेला आहे. २ मार्च रोजी प्लांटमधून ५२४ गॅस सिलिंडर ट्रकमध्ये भरण्यात आले होते, जे कानपूर देहात येथील गजनेर येथे पाठवायचे होते.

होळीच्या सणामुळे ट्रक चालक राजकुमार ट्रक प्लांटच्या बाहेर उभा करून घरी गेला होता. काही दिवसांनंतर ६ मार्च रोजी माहिती मिळाली की, ट्रक झाशीच्या बडागाव पोलीस स्टेशन हद्दीतील पारीछा जवळ हायवेच्या कडेला रिकामा उभा आहे. जेव्हा ट्रक मालक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना दिसलं की, ट्रकमधील सर्व गॅस सिलिंडर गायब होते.

ट्रक मालकाने यानंतर तातडीने सीपरी बाजार पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. पोलीस निरीक्षक जयप्रकाश चौबे यांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून चोरीला गेलेल्या गॅस सिलिंडरचा शोध घेण्यासाठी पथकं तैनात केली आहेत. लवकरच आरोपींचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.
 

Web Title : झाँसी: कमी के डर के बीच 524 एलपीजी सिलेंडरों से भरा ट्रक चोरी

Web Summary : पेट्रोलियम आपूर्ति को लेकर वैश्विक चिंताओं के बीच, उत्तर प्रदेश के झाँसी से लगभग 18 लाख रुपये के 524 एलपीजी सिलेंडरों से भरा एक ट्रक चोरी हो गया। ट्रक कानपुर देहात जा रहा था। पुलिस चोरी की जांच कर रही है और लापता सिलेंडरों और अपराधियों की तलाश कर रही है।

Web Title : Jhansi: Truck with 524 LPG Cylinders Stolen Amid Shortage Fears

Web Summary : Amid global concerns over petroleum supplies, a truck containing 524 LPG cylinders, worth approximately ₹18 lakh, was stolen from Jhansi, Uttar Pradesh. The truck was en route to Kanpur Dehat. Police are investigating the theft and searching for the missing cylinders and culprits.