शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अमानवी कृत्य! रुग्णालयात ९० वर्षीय कैद्याला बेडसोबत बांधले साखळीने; जेल वॉर्डरचे केले निलंबन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 21:44 IST

Prison News : साखळी बांधलेल्या बेडवरील कैद्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देएटा जिल्हा कारागृहातील जेलर कुलदीपसिंग भदौरिया यांनी सांगितले की, हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ९२ वर्षीय बाबूराम बलवान सिंग ९ मे रोजी आजारी पडला आणि त्याला श्वासोच्छवासाची तीव्र समस्या येऊ लागली.

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेला तोंड देत असताना उत्तर प्रदेशमधील एटाहून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कारागृहातील ९० वर्षांच्या कैद्याला श्वास घेताना त्रास होत होता म्हणून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तुरूंग प्रशासनाने अमानुष वर्तन करत कैद्याला उपचारादरम्यान बेडवर साखळीने बांधले. कैदी पळून जाईल या भीतीने हे कृत्य केले गेले होते, परंतु ९० वर्षांच्या कैद्याबरोबर अशा अमानुष वर्तनाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. साखळी बांधलेल्या बेडवरील कैद्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एटा जिल्हा कारागृहातील जेलर कुलदीपसिंग भदौरिया यांनी सांगितले की, हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ९२ वर्षीय बाबूराम बलवान सिंग ९ मे रोजी आजारी पडला आणि त्याला श्वासोच्छवासाची तीव्र समस्या येऊ लागली. त्यांना जिल्हा रुग्णालय एटा येथे उपचारासाठी आणले गेले, तेथून डॉक्टरांनी अलीगड मेडिकल कॉलेजला पाठवले, परंतु अलीगडमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना १० मे रोजी एटा जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड वॉर्डमध्ये परत दाखल करण्यात आले. पुढे अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णालयात कैद्यासोबत ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने वयोवृद्ध कैद्याच्या एका पायाला बेडी लावली आणि दुसर्‍या टोकाला बेडला साखळ्याने बांधून कुलूप लावले. 

 

 

प्रकरण उजेडात आल्यानंतर जेल प्रशासनाचे  डीजी आनंद कुमार यांनी घटनेची दखल घेत संबंधित तुरूंगातील वॉर्डर अशोक यादव यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. यासह  पर्यवेक्षणीय  अधिकाऱ्याकडून याबाबत स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे.   DG PRISONS U.P  या ट्विटर हँडलवरील कारवाईची माहिती देताना असे म्हटले आहे की, दोषी ठरविण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा कर्मचाऱ्याला सोडले जाणार नाही. माहिती मिळाल्यानंतर कैद्याला बेडसोबत लावलेली साखळी उघडण्यात आली आहे.

टॅग्स :jailतुरुंगUttar Pradeshउत्तर प्रदेशPrisonतुरुंगsuspensionनिलंबनhospitalहॉस्पिटल