कुख्यात गोल्डी शंभरकरची हत्या साथीदारांनी केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 18:11 IST2021-10-22T18:11:02+5:302021-10-22T18:11:27+5:30

Murder Case : अमली पदार्थाच्या व्यवहारातून घडली घटना

Infamous Goldie Shambharkar was killed by his accomplices | कुख्यात गोल्डी शंभरकरची हत्या साथीदारांनी केली हत्या 

कुख्यात गोल्डी शंभरकरची हत्या साथीदारांनी केली हत्या 

ठळक मुद्देमाहिती कळाल्यानंतर पाचपावली पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोल्डीला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुन्हेगार गोल्डी शंभरकर याची त्याच्या साथीदारांनी गुरुवारी सकाळी निर्घुन हत्या केली. अमली पदार्थाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जाते.


या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार जहांगीर खान आणि मृतक गोल्डी हे दोघे मित्र होते. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही अमली पदार्थाच्या विळख्यात अडकले होते. यांच्यात त्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर, आरोपी जहांगीर खान तसेच त्याचे साथीदार शाकीर खान, फय्याज आणि नियाज यांनी गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास गोल्डी शंभरकर याला त्याच्या घरापासून काही अंतरावर नेले आणि चाकूचे घालून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. माहिती कळाल्यानंतर पाचपावली पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोल्डीला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.


गुरुवारी सकाळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा तसेच उपायुक्त लोहित मतानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचपावली पोलिसांकडून  माहिती घेतल्यानंतर मतानी यांनी आरोपींना शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागात पथके रवाना केली. वृत्त लिहिस्तोवर आरोपी पोलिसांना मिळाले नव्हते.

Web Title: Infamous Goldie Shambharkar was killed by his accomplices