Improper touches young girl at time of washing her hair in parlor; Hairdresser get arrested | पार्लरमध्ये केस धुताना तरुणीला केला 'अश्लिल' स्पर्श; हेअर ड्रेसरला अटक

पार्लरमध्ये केस धुताना तरुणीला केला 'अश्लिल' स्पर्श; हेअर ड्रेसरला अटक

ठळक मुद्देव्हि.पी.रोड परिसरात राहणारी पीडित तरुणी केस कापण्यासोबत फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी अल्ताफच्या सलूनमध्ये गेली होती.तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सलमानीला विनयभंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

मुंबई - दक्षिण मुंबईत एका पार्लरमध्ये तरुणीचे केस धुत असताना तरुणीला चुकीचा स्पर्श करणे एका हेअर ड्रेसरला महागात पडलं आहे. या प्रकरणी व्हि.पी.रोड पोलिसांनी अल्ताफ सलमानी या आरोपीला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. याबाबत व्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हि.पी.रोड परिसरात राहणारी पीडित तरुणी केस कापण्यासोबत फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी अल्ताफच्या सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी अल्ताफ सलमानीने फेशिअल केल्यानंतर तिचे केस धुतले. त्यावेळी त्याने तरुणीच्या केसांवर जास्त पाणी ओतले. त्यामुळे तिचे टी-शर्ट ओले झाले. सलमानी त्या महिलेला दुसरे टी-शर्ट द्यायला तयार झाला होता. मात्र, त्या महिलेने नकार दिला. केस आणि टी-शर्ट सुकविण्याच्या नावाखाली आरोपीने आपल्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. त्यावरून तरुणीने अल्ताफ सलमानीला खडेबोल सुनावले. तरीदेखील उर्मट अल्ताफ सलमानी तरुणीलाच उलट बोलू लागल्याने तरुणीने व्हि.पी.रोड पोलिसात तक्रार नोंदवली. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सलमानीला विनयभंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

Web Title: Improper touches young girl at time of washing her hair in parlor; Hairdresser get arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.