पती दुबईत, पत्नीचं गावातल्याच तरुणाशी सूत जुळलं; अडसर ठरणाऱ्या साऱ्याला दारू पाजून बागेत नेलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 21:41 IST2026-02-04T21:41:21+5:302026-02-04T21:41:55+5:30
सरायलखंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयसिंगपूर येथील ५४ वर्षीय सुबच्चन राजभर यांचा मृतदेह १ फेब्रुवारी रोजी चोरपाखुर्द येथील एका बागेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.

पती दुबईत, पत्नीचं गावातल्याच तरुणाशी सूत जुळलं; अडसर ठरणाऱ्या साऱ्याला दारू पाजून बागेत नेलं अन्...
उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातून एक दक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पती कामानिमित्त दुबईत गेल्यानंतर सुनेचे गावातीलच एका तरुणाशी सूत जुळले. त्यांच्या संबंधात सासरा अडसर ठरू लागला. यानंतर सुनेने त्यांची हत्या केली, असे पोलीस तपासातून समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय? -
सरायलखंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयसिंगपूर येथील ५४ वर्षीय सुबच्चन राजभर यांचा मृतदेह १ फेब्रुवारी रोजी चोरपाखुर्द येथील एका बागेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यासंदर्भात पोलिसांना मृताची सून, तिचा प्रियकर राममिलन राजभर आणि त्याचे दोन साथीदार सुधीर आणि छट्ठू राजभर यांना अटक केली आहे. तसेच, त्यांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू, तीन मोबाईल आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. सुबच्चन हे एक फळविक्रेते होते.
अनैतिक संबंधांतून सासऱ्याचा खून -
अप्पर पोलीस अधीक्षक अनूप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबच्चन यांचा मुलगा गेल्या दोन वर्षांपासून दुबईत मजुरी करतो. त्यांच्या सुनेचे राममिलन नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, चौकशीत सुनेने आपल्या साऱ्यावर वाईट नजर होती मारहाणीचा आरोप केला. मात्र, सुनेच्या अनैतिक संबंधांत सारे अडसर बनत होते, म्हणून तीने कट रचला, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सुबच्चन यांना दारू पाजली अन्... -
साऱ्याचा अडसर दूर करण्यासाठी सुनेच्या प्रियकराने आपल्या सहकाऱ्यांसह हत्येचा रट रचला. आरोपींनी १ फेब्रुवारीच्या रात्री सुबच्चन यांना दारू पाजली आणि नशेच्या धुंदीत त्यांना बागेत घेऊन गेले आणि तेथेच चाकूने गळा चिरून त्यांची हत्या केली. या घटनेच्या खुलाशानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.