गुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 04:42 PM2020-08-05T16:42:47+5:302020-08-05T16:44:17+5:30

त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केलेले असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे .

The heinous murder of an old man who went to keep cattle | गुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाची निर्घृण हत्या

गुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्देमोहन कदम हे सोमवारी दुपारीगुरे राखण्यासाठी माळरानावर गेले होते.या घटनेची महिती मिळताच देवगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

देवगड : देवगड तालुक्यातील दहिबाव आयतन पन्हळ येथील माळरानावर मोहन फटू कदम ( ६० रा . दहीबाव आयतनवाडी ) याचा मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केलेले असून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे .

मोहन कदम हे सोमवारी दुपारीगुरे राखण्यासाठी माळरानावर गेले होते.या घटनेची महिती मिळताच देवगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार , दहीबाव आयतनवाडीयेथील मोहन कदम हे सोमवारी दुपारी १.३० वा . सुमारास घरात जेवण झाल्यानंतर गुरे राखण्यासाठी देवगड - मालवण महामार्गावर दहीबाव आयतन पन्हळ या ठिकाणी गेले होते . सायंकाळी उशिरापर्यंत ते घरीआले नाहीत. म्हणून त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली मात्र ते आढळून आले नाहीत .

सकाळी शोधघेत असताना आयतन पन्हळ येथील माळरानावर मोहन कदम यांचा मृतदेह उपड्या अवस्थेत आढळून आला . त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वर केल्याचे दिसून आले.याबाबत ग्रामस्थांनी तात्काळ देवगड पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर शरीरावर असलेल्या वार व जखमा यामुळे खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.मात्र खून कोणी केला व कशासाठी याची माहिती अद्याप मिळालेली नाही. देवगड पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

Web Title: The heinous murder of an old man who went to keep cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.