Bajrang Dal office bearers in Sangamner | संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

ठळक मुद्देअयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असताना संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी नवीन नगर रस्त्यावरील श्रीराम मंदिर परिसरात एकत्र जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

संगमनेर : शहरातील नवीन नगर रस्त्यावरील अभिनव नगर येथील श्रीराम मंदिरात आरती करण्यासाठी एकत्र जमलेल्या बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी साडे बाराच्या सुमारास या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.


अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असताना संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी नवीन नगर रस्त्यावरील श्रीराम मंदिर परिसरात एकत्र जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अभय परमार, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे तेथे पोहोचले. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत सरकारी वाहनात बसवून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असल्याने संगमनेर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

Web Title: Bajrang Dal office bearers in Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.