शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस होता होता बसला जबरी चोरीचा शिक्का; मित्राच्या मोबाईलच्या इच्छेपायी त्यांनी केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 19:37 IST

३ मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार असा ५ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त.

ठळक मुद्देहडपसर पोलिसांनी केली तिघांना अटक

पुणे : मोबाईल हरविल्याने त्याने मित्राकडे नवीन मोबाईल घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सराईत गुन्हेगाराने मित्राला नवीन मोबाईल घेऊन देण्याऐवजी रस्त्यात रिक्षाचालकाला चाकुचा धाक दाखवून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता.हडपसरपोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून ३ मोबाईल, रोख रक्कम, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार असा ५ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.बाबासाहेब वसंत कदम (वय३०, रा. माळवाडी, हडपसर), संतोष शंकर गुंजाळ (वय २४, रा. शेवाळवाडी) आणि विनित रामचंद्र वाकडे (वय २३, रा. साईनाथनगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.गुंजाळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जबरी चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत़ विनित वाकडे हा स्वत: बॉक्सर आहे. सधन कुटुंबातील विनित पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत होता.या दोघांनी लॉकडाऊनमध्ये भाजीविक्रीचा व्यवसायही केला होता.त्यांचा मित्र बाळासाहेब कदम हा एका झायलो कारवर चालक म्हणून काम करतो. कदम याचा मोबाईल हरवला होता. गुंजाळकडे त्याने मोबाईल घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते तिघे कदम याच्याकडील झायलोमधून जात असताना त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ एक रिक्षाचालक उभा असलेल्या दिसला. त्यांनी रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोकड काढून घेऊन ते गाडीतून निघून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस कर्मचारी नितिन मुंढे, शशिकांत नाळे, अकबर शेख, प्रशांत टोणपे यांना डी पी रोडला आरोपी थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस