शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Whatsapp वर पत्नीला त्याने पाठवला गुड मॉर्निंगचा मेसेज अन् पतीने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 18:32 IST

मेसेजला रिप्लाय दिल्यामुळे आपला जीव गमवून इतकी किंमत मोजावी लागेल हे त्याला कधीच ठाऊक नव्हता.

ठळक मुद्देही खळबळजनक घटना झारखंडमधील हजारीबाग शहरातील कटकमदाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. संतप्त ग्रामस्थ व कुटुंबीयांनी हजारीबाग-सिमरिया रस्ता रोखला.

झारखंड - सकाळीच सकाळी मिळालेल्या गुड मॉर्निंग या मेसेजमुळे बरेच लोक खूप खूष होतात. पण झारखंडमध्ये असे घडले आहे की, गुड मॉर्निंग मेसेजने एका तरूणाचा जीव घेतला आहे. मोबाईल मेसेजेला उत्तर देणं इतकं महागात पडेल असं या तरुणाला वाटलं नव्हतं. मेसेजला रिप्लाय दिल्यामुळे आपला जीव गमवून इतकी किंमत मोजावी लागेल हे त्याला कधीच ठाऊक नव्हता.ही खळबळजनक घटना झारखंडमधील हजारीबाग शहरातील कटकमदाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या परिसरात एका युवकाने सुलताना गावात राहणार्‍या महिलेच्या मेसेजला उत्तर दिले होते. यामुळे चिडलेला महिलेचा नवरा फैसल याने युवकाला चाकू भोसकून ठार मारले. मृत युवकाचे नाव मोहम्मद सलमान अन्सारी (२४) असं असून सलमान सुल्तान गावचा रहिवासी होता. सलमानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, या युवकाचे फक्त १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.कटकमदाग येथे राहणाऱ्या महिलेचा दोन दिवसांपूर्वी गुड मॉर्निंग असा मेसेज आला असल्याचा आरोप परिवाराने केला आहे. मृत सलमानच्या पत्नीने तिच्या मैत्रिणीचा मेसेज समजून त्या मेसेजला रिप्लाय दिला. सलमानच्या पत्नीचे माहेर देखील सुल्तान गावात आहे. आरोपी फैसलने हा मेसेज पाहताच त्याने आपल्या पत्नीची विचारपूस केली. पत्नीने सांगितले की,  हा नंबर तिच्या माहेरी राहणार्‍या सलमानचा आहे. यामुळे भडकलेल्या आरोपी फैसल आपला भाऊ आणि दोन माणसांसह पत्नीच्या गावात पोहोचला आणि पत्नीच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पत्नीच्या वडिलांसह आणि काही लोकांसह आरोपी फैसल सलमानच्या घरी पोहोचले आणि त्याची चौकशी केली.

दरम्यान, फैसल आणि सलमानच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. हे प्रकरण इतके टोकाला गेले की संतप्त आरोपी फैसलने सलमानवर चाकूने हल्ला केला. सलमान जखमी झाला. हे पाहून इतरजण घटनास्थळावरून पळून गेले. जखमी सलमानला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त ग्रामस्थ व कुटुंबीयांनी हजारीबाग-सिमरिया रस्ता रोखला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपJharkhandझारखंड