शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:18 IST

पत्नीच्या फेसबुक वापरामुळे संतापलेल्या पतीने तिला बेदम मारहाण करून ठार मारलं.

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एराजीकंचनपूर गावातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या फेसबुक वापरामुळे संतापलेल्या पतीने तिला बेदम मारहाण करून ठार मारलं. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बिदुपूर पोलिसांना माहिती दिली. बिदुपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी येऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या वडिलांना याप्रकरणी अटक केली आहे. दिव्या कुमारी (२७) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती एराजीकंचनपूर गावातील रहिवासी अभिषेक कुमार उर्फ ​​राजाची पत्नी आहे. रिपोर्टनुसार, फेसबुक वापरावरून झालेल्या वादातून तिचा पती अभिषेकने काल रात्री दिव्याला बेदम मारहाण केली, यामध्ये तिचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी आज सकाळी महिलेचे वडील मनोज सिंह यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वडील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बिदुपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवला. आरोपी पती अभिषेक कुमार उर्फ ​​राजा आणि त्याचे वडील रवी रंजन उर्फ ​​बबलू यांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक कुमार उर्फ ​​राजा याचा गुन्हेगारी इतिहास आहे.

एसडीपीओ फॉरेस्ट सुबोध कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिदुपूर पोलील स्टेशन हद्दीतील एराजीकंचनपूर गावात एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली. वेगाने कारवाई करत बिदुपूर पोलीस स्टेशन प्रमुखांनी आरोपी पती अभिषेक कुमार उर्फ ​​राजा आणि त्याचे वडील रवी रंजन उर्फ ​​बबलू यांना अटक केली. चौकशीदरम्यान, महिलेने फेसबुक वापरल्याने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि नंतर हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Horror! Wife's Facebook Use Enraged Husband; She Was Killed

Web Summary : In Bihar, a husband killed his wife for using Facebook. He beat her to death. Police arrested the husband and his father. The victim was 27 years old. Investigation revealed the fight started due to the wife's Facebook use.
टॅग्स :BiharबिहारFacebookफेसबुकDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस