शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा, मला घेऊन जा, हे मला मारून टाकतील'; फोन ठेवताच इन्स्टाग्राम स्टारचा सासरी संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:35 IST

सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आपलं आयुष्य संपवल्याची घटना मध्य प्रदेशात घडली.

Palak Rajak Death: "बाबा, मला इथून कसंही करून घेऊन जा... सासरचे लोक मला गाडी आणि सोन्याच्या साखळीसाठी सतत त्रास देत आहेत. तीन दिवसांपासून मला धड जेवणही मिळालेलं नाही, घरातलं कोणी माझ्याशी बोलत नाहीये. हे लोक मला जिवंत सोडणार नाहीत, मला मारून टाकतील..." हे काळीज पिळवटून टाकणारे शब्द होते २० वर्षीय पलक रजकचे. आपल्या वडिलांशी फोनवर बोलताना पलक ढसाढसा रडत होती आणि सुटकेची मागणी करत होती. मात्र दुर्दैवाने या फोननंतर अवघ्या २० मिनिटांतच पलकचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी माहेरच्यांना मिळाली.

अवघ्या वर्षभरात सुखाचा संसार उद्ध्वस्त

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अमित रजक याच्याशी पलकचा विवाह एप्रिल २०२५ मध्ये थाटामाटात झाला होता. अमित हा महाराजपुरा एअरबेसवर कंत्राटी पद्धतीने काम करतो. लग्नात पलकच्या वडिलांनी सोने-चांदी, मोटारसायकल आणि इतर साहित्य दिले होते. तसेच लग्नात दिलेले फिक्स डिपॉझिटचे पैसेही सासरच्यांनी काढून घेतले होते. एवढे देऊनही सासरच्यांचे समाधान झाले नाही. लग्न झाल्यापासूनच पती अमित, सासू आणि दीर यांनी पलककडे आलिशान कार आणि सोन्याच्या चेनची मागणी लावून धरली होती.

'त्या' फोननंतर २० मिनिटांतच खेळ संपला

१२ मे च्या रात्री पलकनेने रडत रडत आधी वडिलांना आणि नंतर भाऊ प्रिन्सला फोन केला. ती अत्यंत घाबरलेली होती आणि सासरचे लोक आपल्याला मारून टाकतील अशी भीती व्यक्त करत होती. लेकीचा रडण्याचा आवाज ऐकून वडिलांनी तात्काळ भाऊ प्रिन्सला तिला आणण्यासाठी सासरी पाठवले. प्रिन्स बहिणीला आणण्यासाठी घराबाहेर पडलाच होता, तितक्यात अवघ्या २० मिनिटांत पलकचा पती अमितचा फोन आला आणि त्याने सांगितले की पलकने गळफास लावून आत्महत्या केली. प्रिन्स तात्काळ रुग्णालयात पोहोचला, तेव्हा पलकचा मृतदेह तेथील स्ट्रेचरवर पडलेला होता.

मृतदेहावर जखमांच्या खुणा

पलकच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर हत्येचा थेट आरोप केला आहे. पलकने आत्महत्या केली नसून, तिची गळा दाबून हत्या करण्यात आली, असा दावा माहेरच्यांनी केला आहे. पलकच्या पायावर, मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमांच्या खुणा आढळल्या. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तसेच संपूर्ण शवविच्छेदनाचे व्हिडिओ शूटिंग करावे आणि फॉरेन्सिक तपासणी करावी, अशी मागणी केली.

'तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले'

दुसऱ्या बाजूला, सासरच्या लोकांनी हुंड्याचा आणि छळाचा आरोप फेटाळून लावला. पलकचे सासरे बाबूलाल यांनी पोलिसांना सांगितले की, ते बाजारातून परत आले तेव्हा लहान मुलाने पलक खोलीचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. दरवाजा तोडून आत पाहिले असता ती छताच्या पंख्याला लटकलेली दिसली, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

इंस्टाग्राम रिल्स स्टार होती पलक

पलक ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. इंस्टाग्रामवर ती रिल्स बनवून पोस्ट करायची, जिथे तिचे जवळपास १०,००० फॉलोअर्स होते. ऑनलाइन अत्यंत आनंदी दिसणाऱ्या पलकच्या आयुष्यात सासरी एवढे मोठे वादळ सुरू असेल, याची कल्पना तिच्या फॉलोअर्सनाही नव्हती.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram star's suspicious death after desperate call to father.

Web Summary : Palak Rajak, 20, died suspiciously after alleging dowry harassment. She called her father, fearing for her life, just minutes before her death. Family alleges murder due to dowry demands. Police investigate conflicting accounts.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाdowryहुंडाPoliceपोलिस