नवा ट्विस्ट! "माझ्या मृत्यूला..."; नवविवाहितेने शूट केला होता Video, कुटुंबीयांना मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:11 IST2026-05-13T13:09:58+5:302026-05-13T13:11:49+5:30

सासरच्या मंडळींनी कोट्यवधींच्या संपत्तीसाठी तिला मारहाण करून तिची हत्या केली, असा दावा माहेरच्यांनी केला होता. मात्र आता एक नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास करत आहेत.

greater noida murder accused arrested but monika nagar himself hanging video revealed | नवा ट्विस्ट! "माझ्या मृत्यूला..."; नवविवाहितेने शूट केला होता Video, कुटुंबीयांना मोठा धक्का

फोटो - आजतक

२२ वर्षीय मोनिका नागरच्या मृत्यू प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. सुरुवातीला मोनिकाच्या कुटुंबीयांनी तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. सासरच्या मंडळींनी कोट्यवधींच्या संपत्तीसाठी तिला मारहाण करून तिची हत्या केली, असा दावा माहेरच्यांनी केला होता. मात्र आता एक नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास करत आहेत.

दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडी गावात ही घटना घडली आहे. मोनिकाचं लग्न साधारण तीन महिन्यांपूर्वी प्रिन्स चौहान याच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच पैसे आणि मालमत्तेवरून वाद सुरू झाल्याचा आरोप मोनिकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी मोनिकाने फोन करून सांगितलं होतं की, सासरचे लोक तिला मारहाण करत आहेत. या फोननंतर काही वेळातच तिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तिची हत्या करून घाईघाईने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही तिच्या कुटुंबाने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली.

"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव

मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पतीसह इतर लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती प्रिन्स चौहानला अटकही केली आहे. घटनेच्या पाच दिवसांनंतर आता ६ मिनिटं १३ सेकंदांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मोनिका रडताना दिसत असून ती म्हणतेय, "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही." त्यानंतर ती पंख्याला गळफास घेते.

लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."

व्हिडिओची सत्यता आणि परिस्थितीची पोलीस चौकशी करत आहेत. मोनिकाचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. हा व्हिडिओ कधी रेकॉर्ड झाला, त्यात काही एडिटिंग केलं आहे का, किंवा व्हिडीओ बनवताना तिच्यावर काही दबाव होता का? या सर्व गोष्टींचा शोध पोलीस घेत आहेत.

दादरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे प्रकरण हत्येच्या कलमान्वये नोंदवण्यात आले असून तपास सुरू आहे. व्हिडीओ, कॉल रेकॉर्ड, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि कुटुंबीयांचे आरोप या सर्व पैलूंचा विचार करून पुढील कारवाई केली जाईल. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

Web Title : नवविवाहिता का वीडियो ट्विस्ट: 'मेरी मौत के लिए कोई जिम्मेदार नहीं'

Web Summary : मोनिका नागर की मौत के मामले में एक वीडियो सामने आने से नया मोड़ आया। दहेज के लिए हत्या का संदेह था, लेकिन वीडियो में मोनिका ने आत्महत्या से पहले कहा कि कोई जिम्मेदार नहीं है। पुलिस वीडियो की प्रामाणिकता और परिस्थितियों की जांच कर रही है।

Web Title : Newlywed's Video Twist: 'No one is responsible for my death'

Web Summary : Monika Nagar's death case takes a turn with a video surfacing. Initially suspected as murder for dowry, the video shows Monica stating no one is responsible before an apparent suicide. Police are investigating the video's authenticity and circumstances surrounding her death, considering all angles.