शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

पुण्यात मित्रानेच केला छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:33 PM

पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एकाने छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार केला़

पुणे : पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एकाने छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार केला़ त्यात मित्र जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ ही घटना नांदेड फाटा येथील दळवीनगरमध्ये बुधवारी रात्री साडे दहा वाजता घडली. रोनित देवीदास राठोड (वय २५, रा़ दळवीनगर, नांदेडफाटा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी भरत वाघ (वय २७, रा़ दळवीनगर, नांदेडफाटा) याला अटक केली असून भय्या प्रसाद शेलार (वय १८) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनित राठोड आणि भरत वाघ हे दोघे मित्र असून ते जवळजवळ राहतात. त्यांच्या काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा राग भरत याच्या मनात होता. बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास भरत रोनित याच्याकडे गेला. त्यावेळी त्याच्या बरोबर भैय्याही होता. त्यावेळी रागाच्या भरात भरत याने आपल्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून रोनितवर दोन गोळ्या झाडल्या. त्या रोनितच्या पोटात शिरल्या. ही घटना पाहिल्यानंतर रोनित याच्या पत्नीने त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेल्या व पोलिसांना याची माहिती दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बंदुक जप्त करुन दोघांनाही ताब्यात घेतले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfireआगPoliceपोलिस