डान्सबार चालकाची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 00:59 IST2020-07-14T00:58:59+5:302020-07-14T00:59:45+5:30

कर्जबाजारीपणामुळे त्यांनी स्वत:सह संपूर्ण कुटुंबाचे जीवन संपविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

Dancebar driver's wife, two children commit suicide | डान्सबार चालकाची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या

डान्सबार चालकाची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या

सोलापूर : पुणे रोडवरील गॅलक्सी डान्सबारचे चालक अमोल अशोक जगताप (३६) यांनी पत्नी मयुरी (२७), मुले आदित्य (६) आणि आयुष (३) यांच्यासह सोमवारी गळफास घेतल्याचे आढळून आले. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी स्वत:सह संपूर्ण कुटुंबाचे जीवन संपविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल यांनी प्रथम दोन्ही मुलांना गळफास लावला. त्यानंतर पत्नीसह त्यांनी फास घेऊन जीव दिला. ही घटना सायंकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. शेजारच्यांना संपूर्ण कुटुंब फासावर लटकल्याचे निदर्शनास आले, जगताप यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी मुरारजी पेठेत राहणाऱ्या आपल्या भावाला मोबाईल करून आपण जीवन संपवित असल्याचे सांगितले होते, अशीही माहिती पुढे येत आहे.
पत्नीचा खून करून आत्महत्या
नाशिक : चारित्र्याचा संशय घेत पतीने डोक्यात फावडा घालून पत्नीचा खून करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. पेठ तालुक्यातील करंजाळी नजिक उभीधोंड परिसरात ही घटना घडली आहे. पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊभीधोंड येथील सोमनाथ सीताराम गवळी (४५) याने पत्नी विठाबाई (४३) हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत लोखंडी फावड्याने डोक्यावर, चेहºयावर वार करत हल्ला केला. त्यानंतर तो फरार झाला. सोमवारी सोमनाथने झाडाला गळफास घेतल्याचे आढळले.

Web Title: Dancebar driver's wife, two children commit suicide