The culmination of shamelessness! Husband at china border, wife and daughter in village molested by vilagers; In the name of help, the police say ... | निर्लज्जपणाचा कळस! पती चीन सीमेवर, गावात पत्नी अन् मुलीसोबत छेडछाड; मदतीच्या नावावर पोलीस म्हणतात...

निर्लज्जपणाचा कळस! पती चीन सीमेवर, गावात पत्नी अन् मुलीसोबत छेडछाड; मदतीच्या नावावर पोलीस म्हणतात...

ठळक मुद्देदुसर्‍या गावातून विशिष्ट जातीचे लोक येथे जनावरे चरण्यासाठी येतात. मुलीची आणि माझी ते छेड काढतात.एसपी डॉ. श्रीपती मिश्रा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लार पोलीस प्रभारी आणि सर्व संबंधित पोलिसांना बोलावले आहे. या प्रकरणातही काही लोकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भटनी  पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस अधिकारी असलेले भीष्मपाल सिंग यादव यांना महिलेसमोर हस्तमैथुन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आणि अटक देखील करण्यात आली. त्यांनतर यादवच्या आई-मुलीवर केलेल्या वाईट कृत्याचे प्रकरण अद्याप लार परिसरात चर्चेचा विषय बनला असून हे प्रकरण शांत झाले नाही. गुरुवारी आई-मुलीने एसपीकडे तक्रार केली. एसपीने स्टेशन प्रभारी आणि सर्व सैनिकांना सोमवारी बोलावले होते.


लार पोलीस ठाणे हद्दीतील एक व्यक्ती सैनिक आहे. सध्या तो चीन सीमेसह लडाख येथे तैनात आहे. बायको आणि दोन मुली गावाबाहेर घर बांधून राहतात. या महिलेचे म्हणणे आहे की, दुसर्‍या गावातून विशिष्ट जातीचे लोक येथे जनावरे चरण्यासाठी येतात. मुलीची आणि माझी ते छेड काढतात. विरोध केल्यानंतर ते विटा आणि दगड घरावर फेकतात. ५ जून रोजी त्यांनी मला आणि माझ्या मुलीला मारहाण केली होती. याप्रकरणी लार पोलिसांनी गुन्हा दाखल केला, परंतु कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे त्याचे मन आणखी खचून गेले.

गुरुवारी आई-मुलीने एसपी कार्यालय गाठले आणि एसपीला संपूर्ण घटना सांगितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक पोलीस शिपाई आला आणि त्याने सांगितले जेव्हा तुम्ही मेजवानी द्याल तेव्हाच मदत करू. त्यावर ती महिला सांगते की, जेव्हा माझ्या घरात पुरुष सदस्य नाही तर त्यांना कसे खाऊ घालणार. एसपी डॉ. श्रीपती मिश्रा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लार पोलीस प्रभारी आणि सर्व संबंधित पोलिसांना बोलावले आहे. या प्रकरणातही काही लोकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

 

Web Title: The culmination of shamelessness! Husband at china border, wife and daughter in village molested by vilagers; In the name of help, the police say ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.