भयंकर! पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्याने पती झाला हैवान; 8 महिन्यांच्या लेकीला जमिनीवर आपटून घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 03:55 PM2021-08-01T15:55:04+5:302021-08-01T16:05:34+5:30

Crime news : पत्नीने सोबत जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने आपल्याच आठ महिन्यांच्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

crime news father killed his 8 month old daughter in bijnor uttar pradesh | भयंकर! पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्याने पती झाला हैवान; 8 महिन्यांच्या लेकीला जमिनीवर आपटून घेतला जीव

भयंकर! पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्याने पती झाला हैवान; 8 महिन्यांच्या लेकीला जमिनीवर आपटून घेतला जीव

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पती-पत्नीतील भांडणाने एका चिमुकलीचा जीव घेतला आहे. माहेरी असलेल्या पत्नीने सोबत जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने आपल्याच आठ महिन्यांच्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पतीने बाळाला पत्नीच्या हातातून खेचून घेऊन जमिनीवर आपटलं, यानंतर बाळ गंभीररित्या जखमी झालं. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) घेऊन जाण्यात आलं मात्र डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिजनौर मंडावली येथील रहिवासी असलेल्या नाजिमचं राहतपूरच्या मेहताबसोबत दीड वर्षापूर्वी लग्न झालं. दोघांना एक मुलगी होती. मात्र, पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे मेहताबने पतीचं घर सोडलं आणि ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली. नाजिम पत्नीला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचला होता. त्याने पत्नीला आपल्यासोबत येण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी देखील नाजिम नशेत असल्याने दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला.

मेहताबने पतीसोबत जाण्यास नकार दिला. याच कारणामुळे रागावलेल्या नाजिमने पत्नीच्या हातातून बाळ हिसकावून घेतलं आणि आठ महिन्यांच्या चिमुकलीला जोरात जमिनीवर आदळलं. या घटनेत आठ महिन्यांची चिमुकली गंभीर जखमी झाली. चिमुकलीला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी नाजिम याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

क्रूरतेचा कळस! रुग्णालयात नर्सकडून 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण; हातही मोडला

दिल्लीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नर्सकडून एका 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत बाळाचा हातही मोडला आहे. दिल्लीच्या एका रुग्णालयातील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा भीषण प्रकार उघड झाला आहे. यामध्ये एक नर्स दोन महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. 24 जुलैला रात्री ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या याचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: crime news father killed his 8 month old daughter in bijnor uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app