शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : संचारबंदीदरम्यान अ‍ॅट्रासिटी दाखल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:09 IST

CoronaVirus Lockdown : याप्रकरणी होमगार्ड शैलेश माळी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

ठळक मुद्दे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीची अंमलबजावणी कोल्हापूर शहरात काटोकोरपणे सुरु आहे. शेखर सनदी याने एका पेपरचा आपण संपादक असून सदर बाजार येथे राहत असल्याचे माळी यांना सांगितले.

कोल्हापूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून कोल्हापूर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या होमगार्डला अ‍ॅट्रासिटीची धमकी देणाऱ्या सदर बाजार येथील शेखर सनदी या व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी होमगार्ड शैलेश माळी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीची अंमलबजावणी कोल्हापूर शहरात काटोकोरपणे सुरु आहे. यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने विविध मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांना मदत म्हणून होमगार्डच्या जवानांचीही मदत घेतली जाते.दि.२७ मार्च रोजी रात्री ८.३0 वाजण्याच्या सुमारास होमगार्ड जवान शैलेश माळी हे सदर बाजार येथील मस्जिद चौकाजवळ बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी सदर बाजार येथील शेखर सनदी याने तोंडाला मास्क न घालता माळी यांच्याजवळ येत दमदाटी केली.होमगार्डला ड्यूटी लागलेली नाही, लोकांना घरी बसा म्हणून सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार अशा शब्दात त्याने दमदाटी केली. तसेच तुम्ही लोकांना दमदाटी करु नका, अशी उध्दट भाषा वापरत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.शेखर सनदी याने एका पेपरचा आपण संपादक असून सदर बाजार येथे राहत असल्याचे माळी यांना सांगितले. मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे, हे सांगत आपल्याजवळील मोबाईल कॅमेऱ्यावरुन शूटींग केल्यासारखे केले.तुम्ही कशी ड्यूटी करता हे एस.पी आणि डीवायएसपी यांना पाठवतो, असे म्हणत अरेतुरेच्या भाषेत धमकी दिली आणि येथून निघून जाण्यास सांगितले. सनदी याने जवान माळी यांना धक्का देत तुमच्यावर अ‍ॅट्रासिटीची तक्रार करण्याचीही धमकी दिली.जवान माळी यांनी याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात सनदी याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून भा. दं. वि.  कलम ३५३, ३२३, ५0६ तसेच महाराष्ट्र COVID 19 उपाय योजना २0२0 चे कलम ११ नुसार सनदी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस