शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 21:27 IST

Conversion case : मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये गिरीशचंद श्रीवास्तव यांनी जावई धर्मेंद्र श्रीवास्तव याच्या विरोधात त्यांची मुलगी आणि नातवावर जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाला जबरदस्तीने मुस्लिम धर्मात बदलण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. हा तरुण असे का करत होता, या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

‘त्या’ हत्येचे गुढ उकलले, कर्ज फेडण्यासाठी उचलले चोरीचे पाऊल

खळबळ! प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दररोज घरी यायचा, रागाने वडिलांनी जिवंत जाळलेमिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये गिरीशचंद श्रीवास्तव यांनी जावई धर्मेंद्र श्रीवास्तव याच्या विरोधात त्यांची मुलगी आणि नातवावर जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. गिरीशचंद श्रीवास्तव यांनी कल्याणपूर पोलीस ठाण्यात सांगितले की, धर्मेंद्र इतर धर्मांशी संबंधित अनेक पुस्तके घरात ठेवतात.पुढे त्यांनी सांगितले की, “धर्मेंद्रला माझी मुलगी स्मिता आणि तिच्या मुलाला जबरदस्तीने मुस्लिम बनवायचे आहे. तिने नकार दिल्यावर तो तिला मारहाण करतो." धर्मेंद्र यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याबद्दल पोलिसांनी एफआयआर नोंदवला. धर्मेंद्रला पकडण्यासाठी पोलीस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने विरोध केला. बराच वेळ हाणामारी झाली.त्यानंतर खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, पत्नी आणि मुलावर मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तर पोलीस ठाण्यात त्याच्यावर प्राणघातक हल्ला तसेच धर्म बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल आहे.या प्रकरणाची चौकशी सुरू आहेयाप्रकरणी एडीसीपी ब्रजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, पत्नी आणि मुलावर हल्ला केल्याप्रकरणी धर्मेंद्रला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. एफआयआरमध्ये धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत धर्मांतराचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आरोपी धर्मांतराबाबत विचारल्यास नकार देत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकMuslimमुस्लीम