शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात घरफोडी सत्र थांबेना, सलग तीन घटना उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 20:51 IST

Robbery : लॅपटॉप, दागिने व रोकड लांबविली

ठळक मुद्दे पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगरात प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशाली सोनवणे व मुलगा यश या कुटुंबासह वास्तव्यास आहेत.

जळगाव : शहरात घरफोडींचे सत्र सुरु झाले असून मंगळवारी तीन घटना उघडकीस आल्यानंतर बुधवारीही पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगर येथे प्रदीप दिलीप सोनवणे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ९९  हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगरात प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशाली सोनवणे व मुलगा यश या कुटुंबासह वास्तव्यास आहेत.  प्रदीप सोनवणे हे  एम आर म्हणून काम करतात. ११ जानेवारी रोजी  पत्नी वैशालीसह देवगाव,ता.जळगाव येथे शेतीकामासाठी गेले होते. तेथेच दोघे तेथेच मुक्कामी थांबले. बुधवारी सकाळी ११  वाजता प्रदीप सोनवणे यांना घराशेजारील पूजा पवार यांनी घरफोडी झाल्याची घटना कळविली. त्यानुसार प्रदीप पत्नीसह जळगावात घरी परतले. घरातील कपाटात ठेवलेली रोकड, दागिणे व लॅपटॉप हे दिसून आले नाही. चोरट्यांनी घरातून १० ग्रॅमचे ३० हजारांचे सोन्याचे मेडल, ७ ग्रॅमचे २० हजारांचे सोन्याचे कानातले, १५ ग्रॅमची ४५ हजारांची सोन्याची चैन, ५ ग्रॅमच्या ३०  हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दीड ग्रॅमचे १ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मणी, १३ ग्रॅम ३४ हजारांचे सोन्याच्या अंगठ्या, पेंडल, कानातील बाळी या दागिण्यांसह २० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप,  व १६ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत रात्री वैशाली प्रदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सतीष डोलारे करीत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीJalgaonजळगावPoliceपोलिस