Breaking : खळबळजनक! १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी युसूफ मेमनचा कारागृहात झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:59 PM2020-06-26T15:59:37+5:302020-06-26T16:00:24+5:30

मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Breaking: Yusuf Memon, convicted in 1993 serial bomb blasts, died in jail | Breaking : खळबळजनक! १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी युसूफ मेमनचा कारागृहात झाला मृत्यू 

Breaking : खळबळजनक! १९९३ साखळी बॉम्बस्फोटातील दोषी युसूफ मेमनचा कारागृहात झाला मृत्यू 

Next
ठळक मुद्दे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला.

नाशिक - १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घटनेने अंडरवर्ल्ड जगतात खळबळ माजली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा युसूफ मेमनचा भाऊ आहे. गेल्या २ वर्षांपासून युसूफ मेमन शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाला. 

 

१९९३ मुंबईच्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेमन  (54) याला शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह त्रास होऊ लागल्याने त्यात जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने मेमन याचे निधन झाले. औरंगाबाद कारागृहातून 2018 मध्ये नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह रवानगी करण्यात आली होती. औरंगाबाद कारागृहाच्या पूर्वी मेमन १९९३ पासून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या  युसुफ अब्दुल रज्जाक मेमनचा शुक्रवारी (दि.२६) दुपारी जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०१८ सालापासून मेमन नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. युसुफच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धुळे येथील शासकिय महाविद्यालयात केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


याबाबत कारागृह प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी तथा इब्राहीम मुश्ताक मेमन उर्फ टायगर मेमन आणि याकुब मेमनचा भाऊ असलेला युसुफ मेमन देखील या बॉम्बस्फोटात दोषी आढळून आला होता. औरंगाबाद कारागृहातून युसुफला २०१८ साली नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून तो या कारागृहात शिक्षा भोगत होता. शुक्रवारी सकाळी कारागृहात युसुफला श्वासोच्छवासाकरिता त्रास होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्याला तत्काळ पोलीस वाहनातून कारागृह प्रशासनाने जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र उपचारादरम्यान युसुफला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले,अशी माहिती कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. हृदयविकाराच्या झटक्याने युसुफचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे.


युसुफ हा औरंगाबाद कारागृहात येण्यापुर्वी मुंबईच्या आर्थररोड कारागृहात शिक्षा भोगत होता. दाऊद टोळीशी संबंधित युसुफला १९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आली होती. दहशतवादी कृत्य घडवून आणल्याचा ठपका याकुब, युसुफ मेमनवर न्यायालयाने ठेवला होता. टायगरचा धाकटा तर युसुफचा मोठा भाऊ याकुबला २०१५ साली नागपूरमधील तुरूंगात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. १९९३ बॉम्बस्फोट हा साखळी स्फोट मोठा होता.एकूण १२ स्फोट झाले होते आणि स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागले होते. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला.

Tiger Memon
Tiger Memon

12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?

पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला


दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट

तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन

चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग

पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार

सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम

सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार

आठ स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल

नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा

दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल

अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ

बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल
 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

Read in English

Web Title: Breaking: Yusuf Memon, convicted in 1993 serial bomb blasts, died in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.