शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:04 IST

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंब हादरून गेलं.

उत्तर प्रदेशातील बांदामध्ये एका नवविवाहित महिलेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंब हादरून गेलं. तिचा मृतदेह पाहून वडील रडत रडत म्हणाले, "मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे खर्च करून मुलीचं लग्न लावून दिलं, कर्ज घेऊन सासरच्या लोकांची हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण केली, पण त्यांनी माझ्या मुलीची हत्या केली आणि तिला असं लटकवलं." पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. कुटुंबाच्या तक्रारीवरून हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शहर कोतवाली परिसरातील बलखंडी नाका चौकी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. अटारा कोतवाली परिसरातील रहिवासी असलेल्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी आठ महिन्यांपूर्वी बांदा येथील न्यू मार्केट परिसरातील मुलाशी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. जेव्हा ते मुलीच्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा ती पंख्याला लटकलेली दिसली. पण तिचे पाय जमिनीवर होते.

वडिलांचा दावा आहे की, त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे आणि तिचा मृतदेह लटकवण्यात आला आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की कुटुंबाने त्यांच्या मुलीच्या सासरच्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न केले, खर्च केला. परंतु त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबाने पोलीस कारवाईची मागणी केली आहे.

एएसपी माविस टॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याच्या बलखंडी नाका परिसरात एका नवविवाहित महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. फील्ड युनिट आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो. मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कुटुंबाच्या लेखी तक्रारीवरून हुंडाबळी प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dowry Demands Met, Woman Found Dead; Father Cries Foul Play

Web Summary : In Banda, UP, a newlywed woman was found dead at her in-laws' house. The father alleges dowry-related murder, claiming he fulfilled every demand despite taking loans. Police are investigating the case after registering a dowry death complaint.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसdowryहुंडाmarriageलग्न