शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:01 IST

आग्रा डीसीपी सिटी सोनम कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.

आग्रा पोलिसांनी एक धक्कादायक प्रकार उघड केला. एका आई, भाऊ आणि वहिनीने कुटुंबातील संपत्तीच्या वाटणीसाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलाला आणि सुनेला लाडूंमध्ये विष देऊन ठार मारलं आहे. याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. शाहगंज पोलीस स्टेशन परिसरात ही भयंकर घटना घडली आहे.   

१७ एप्रिल रोजी पती-पत्नीने आत्महत्या केल्याचं समोर आलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पती-पत्नी बेडवर बेशुद्ध पडले होते आणि त्यांची एक महिन्याची मुलगी जवळच रडत होती. पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेतील पती-पत्नीला रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. ज्या ठिकाणी पती-पत्नीचे मृतदेह सापडले तिथे लाडूही पडलेला होता. त्यामुळे पती-पत्नीने आत्महत्या केल्याचं दिसून आलं.

पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले, फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आणि सखोल तपास सुरू झाला. याच दरम्यान पोलिसांनी नातेवाईक आणि जवळच्या लोकांचीही चौकशी केली, त्यानंतर कौटुंबिक वाद असल्याचं समोर आलं. पोलीस तपासात असं दिसून आलं की, आईने तिचा एक मुलगा आणि सुनेसह लाडूमध्ये विष मिसळले होतं आणि ते दुसऱ्या मुलाला आणि सुनेला खायला दिलं होतं, ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.

आग्रा डीसीपी सिटी सोनम कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. डीसीपी सिटी सोनम कुमार यांना सुरुवातीला पती-पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळाली होती. मात्र तपासानंतर असं उघड झालं की, दोघांचीही हत्या लाडूमध्ये विष मिसळून करण्यात आली. या प्रकरणात आई, भाऊ, भावाची पत्नी आणि छोट्या भावाला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस